उधारीवर किराणा दिला नाही म्हणून दुकान चालकाला मारहाण करून लुटले

The shop owner was beaten and robbed for not giving groceries on loan
The shop owner was beaten and robbed for not giving groceries on loan

पुणे : किराणा दुकानातील माल उधार न दिल्यामुळे पाच जणांच्या टोळक्‍याने दुकानदारास अडवून त्याला कोयत्याने मारहाण करून साडेआठ हजार रुपये काढून घेतले. मंगळवारी (ता.19) सायंकाळी कोंढवा बुद्रूक परिसरात ही घटना घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

याबाबत आशिकेत मारुती कचरे (वय 23, रा. गोकुळनगर, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आशिष ढाकले (रा. गोकुळनगर, कोंढवा), सुरेश दयाळू (रा. अप्पर डेपो, बिबवेवाडी) यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे किराणा मालाचे दुकान आहे. आरोपी हे फिर्यादी यांच्या दुकानात किराणा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी कचरे यांनी त्यांना उधार माल देण्यास नकार दिला. याचा राग आरोपींना होता. तक्रारदार हे मंगळवारी सायंकाळी कान्हा हॉटेल चौक येथून जात असताना आरोपींनी त्यांना अडविले.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

किराणा माल उधार का दिला नाही, म्हणून आरोपींनी कचरे यांना हाताने व कोयत्याने जबर मारहाण केली. त्यांच्या खिशातील साडेआठ हजार रुपये काढून घेतले. आरोपींच्या हल्ल्यात तक्रारदार हे जखमी झाले आहेत. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com