आता तरी दार उघडू द्या! व्यापाऱ्यांचे प्रशासनाला साकडे

दुकानांच्या वेळांबाबत पुणे व्यापारी महासंघाने उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेण्याचा प्रयत्न केला होता.
Trade Association
Trade AssociationSakal

पुणे - शहरातील रुग्णसंख्या (Patient) कमी होत असल्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून विस्कळीत झालेले अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी दुकाने (Shop) उघडण्यासाठी (Open) परवानगी (Permission) द्यावी, अशी मागणी शहरातील व्यापारी संघटनांनी (Trade Association) केली आहे. किमान सायंकाळी सहापर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. (Shopkeeper Shops Open Demand Administrative Lockdown)

दुकानांच्या वेळांबाबत पुणे व्यापारी महासंघाने उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ते शक्य झाले नाही. तसेच कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या शहरात कमी झाली आहे. त्यांची कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. तसेच ऑक्सिजनचीही मागणी कमी झालेली आहे, याकडेही व्यापारी संघटनांनी लक्ष वेधले आहे. त्याची दखल घेऊन प्रशासनाने बाजारपेठेबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

Trade Association
Pune Corona: रुग्णसंख्येला उतरती कळा; पुणेकरांना दिलासा

दुकानदारांचे म्हणणे

  • १ जूननंतर तरी दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी

  • दुकाने सरसकट उघडण्यास परवानगी देणे शक्य नसल्यास किमान दुकानांचा वेळ वाढवा

  • गॅरेज, वाहनांचे सुटे भाग, चष्मे, हार्डवेअर, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, पुस्तके, खेळणी, स्टेशनरी, सराफ आदींची दुकानेही नागरिकांसाठी आवश्यक

  • त्यामुळे आता तरी दुकाने उघडण्यास परवानगी देणे गरजेचे आहे

दुकाने आता उघडण्याची वेळ आली आहे. किती दिवस दुकाने बंद करून व्यापारी घरात बसणार? तसेच दुकाने उघडल्यावर गर्दी होईल, अशी चिन्हे नाहीत. कारण नागरिकांच्या हातात पैसाच राहिलेला नाही. अनेकांचे पगार निम्मे झाले आहेत. त्यामुळे बाजारातील कॅश फ्लो आटला आहे.

- सचिन निवंगुणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ

बाजारपेठ सुरळीत झाली तर, कष्टकरी वर्गालाही आधार मिळतो. सध्या त्यांचेही जगणं अवघड झाले आहे. कामगारांना किती दिवस घरात बसून पगार द्यायचा. या सर्वांचा विचार करून १ जूननंतर दुकाने उघडण्यास परवानगी मिळणे गरजेचे आहे.

- सुरेश जैन, अध्यक्ष, पुणे शहर व्यापारी असोसिएशन

राज्य सरकारच्या आवाहनानुसार व्यापाऱ्यांनी सहकार्यही केले. परंतु, आत कमी झालेली रुग्णसंख्या विचारात घेऊन दुकाने उघडण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे. बाजारपेठा सुरू होणे ही नागरिकांचीही गरज आहे, हेही प्रशासनाने लक्षात घ्यावे.

- नितीन पंडित, अध्यक्ष, तुळशीबाग व्यापारी संघटना

दुकाने जवळपास दोन महिने बंद आहेत, त्यामुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. त्यांना सावरण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. किमान ठरावीक वेळेत तरी दुकाने आता उघडण्याची गरज आहे, त्यामुळे बाजारपेठ उभी राहील आणि अर्थचक्र सुरू होईल.

- महेंद्र पितळीया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com