esakal | बारामतीतील दुकाने, हॉटेल आता या वेळेत सुरू राहणार 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामतीत कोरोनाचे एकाच दिवशी पाच रुग्ण सापडल्यानंतर बारामती शहरातील व्यवहारांवर निर्बध आणत संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. आता राज्य सरकारने

बारामतीतील दुकाने, हॉटेल आता या वेळेत सुरू राहणार 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : राज्य सरकारच्या निर्देशानुसार बारामती शहरातील व्यवहार आता उद्यापासून (ता. 10) सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. दरम्यान, हॉटेल व्यावसायिकांना संध्याकाळी सातपर्यंत ग्राहकांना पदार्थ हॉटेलमध्ये बसून देता येतील, तर संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरु ठेवता येणार आहे.

पुणेकरांच्या बेशिस्तीचे घडले दर्शन
 
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज या संदर्भात माहिती दिली. आज शहरातील व्यापारी प्रतिनिधींनी कांबळे यांची भेट घेतली. राज्य सरकारनेच या संदर्भात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकाने व व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बारामतीतही अशी परवानगी देण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगितले. 

वाळूमाफियांकडून महिला तहसीलदारांवर पाळत

बारामतीत कोरोनाचे एकाच दिवशी पाच रुग्ण सापडल्यानंतर बारामती शहरातील व्यवहारांवर निर्बध आणत संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. आता राज्य सरकारने प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतरत्र सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने बारामतीतही व्यवहार सात वाजेपर्यंत सुरू राहतील.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  
 
नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने उशिरापर्यंत कामावर असलेल्यांची पाच वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहत असल्याने मोठी गैरसोय होत होती. या निर्णयाने अशा लोकांना दिलासा मिळणार आहे. लोकांनाही दोन तास अतिरिक्त मिळाल्याने त्यांचीही सोय होणार आहे. दरम्यान, सर्वच दुकानांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनेटायझरचा वापर, येणा-या ग्राहकांची नोंद ठेवणे, अशा बाबी अनिवार्य असून, सर्व व्यावसायिकांनी या बाबींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. 

Edited By : Nilesh Shende