दुकाने, हॉटेलांची वेळ वाढणार? आज होणार निर्णय

राज्य सरकारच्या निर्णयाकडे व्यापारी, हॉटेलचालकांचे लक्ष
Hotel
HotelSakal

पुणे : दुकाने उघडी ठेवण्यास सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी मिळणार का, हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार का, याबाबतच्या निर्णयाकडे व्यावसायिकांसह हॉटेलचालकांचे लक्ष लागले आहे. दुकाने, हॉटेल्सबाबतचा निर्णय आज (ता. २८) होणार आहे.

शहरातील दुकाने, हॉटेल्स सध्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झालेले मॉल्स अद्याप बंद आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी दुकाने, हॉटेल्स सुरू ठेवण्याच्या वेळा वाढविण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्याचे सूतोवाच केले होते.

Hotel
तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल

शहरात १५ जूनपासून दुकाने आणि हॉटेल्स सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्याला आता महिना उलटून गेला आहे. तरीही निर्णयात बदल झालेला नाही. त्यामुळे बाजारपेठेत अस्वस्थता असून नागरिकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाली आहे.

पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया म्हणाले, ‘‘कोरोना रुग्णांची संख्या वाढली तेव्हा दुकाने बंद केली. परंतु, आता संख्या कमी झाली तर, दुकानांच्या वेळा वाढविणे गरजेचे आहे. नोकऱ्या, कर्ज यांचा राज्य सरकार विचार करणार आहे का? सगळ्या प्रकारचे कर तर आमच्याकडून घेणार. पण, व्यवसाय करू देणार नाही, हा काय प्रकार आहे. दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मिळालीच पाहिजे. त्यासाठी आम्ही अनेकदा पालकमंत्र्यांना निवेदने दिली आहेत.’’

Hotel
पुणे विद्यापीठात बी. व्होकेशन कोर्ससाठी अ‍ॅडमिशन सुरू

पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, ‘‘हॉटेल व्यवसाय अनेक महिन्यांपासून हलाखीच्या परिस्थितीत आहे. हॉटेल ही आता चैन राहिली नसून नागरिकांसाठी गरज झाली आहे. पुण्यात तीन हजारांपेक्षा जास्त हॉटेल्स आहेत. त्यांचे अर्थचक्र विस्कळित झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने हॉटेल्स उघडण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com