वकिलांसाठीच्या ई-ग्रंथालयात सुविधांची वानवा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे : शिवाजीनगर न्यायालयात 2006 मध्ये वकिलांसाठी सुरू केलेले ई-ग्रंथालय गेल्या 12 वर्षांत 'अपडेट' झालेच नाही. येथील सहा संगणकांपैकी दोन बंद; तर चार संगणक सुरू आहेत. दिवसभरात न्यायालयात येणाऱ्या सुमारे 6 हजार वकिलांपैकी दीड ते दोन हजार वकील ग्रंथालयाचा रोज वापर करतात. वकिलांची संख्या पाहता सोयीसुविधा अपुऱ्या असल्याचे चित्र आहे. येथील संगणकात कायदा, वकिली, राज्यव्यवस्था आदी विषयांवरील एकही ई-बुक, पुस्तकाची स्कॅन केलेली वा सॉफ्ट कॉपी नाही.

1950 पासूनचे सर्व केस लॉ आहेत, हाच एकमेव फायदा आहे. जुन्या ग्रंथालयातच असलेल्या या ई-ग्रंथालयात एकावेळी चार ते पाच वकील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. "ग्रंथालयात कायद्याव्यतिरिक्त या क्षेत्रात आवश्‍यक असणारी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यावरील; तसेच साहित्यिक पुस्तके उपलब्ध नाहीत,'' असे ऍड. सैफन शेख यांनी सांगितले. 
 
संगणक व टेबल-खुर्च्यांची संख्या कमी असल्याने त्याला ई-ग्रंथालय का म्हणावे, हा प्रश्‍न आहे. कायद्याची सर्व अद्ययावत पुस्तके येथे उपलब्ध असण्याबद्दलही शाश्‍वती नाही. 
- ऍड. विकास शिंदे 

ग्रंथालय व्यवस्थापन समितीसोबत पंधरा दिवसांत बैठक घेऊ. बार असोसिएशन या प्रश्‍नाचा पाठपुरावा करेल. 
- ऍड. सुभाष पवार, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन 

दररोज न्यायालयात येणारे वकील :2 ते 3 हजार 
दररोज ग्रंथालय वापरणारे वकील : 1 ते दीड हजार 
ई-ग्रंथालयातील संगणकांची संख्या : 6 
सुरू असलेले संगणक : 4 
बसण्यासाठी खुर्च्या : 80 ते 85 
टेबलांची संख्या : 16 
 
Web Title: shortage of e-library facilities for lawyer