पर्यटनासाठीच्या परकीय चलनाची पुण्यात चणचण !

कोरोनानंतर परदेशागमनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांना जवळ बाळगण्यासाठीच्या परकीय चलनाचा तुटवडा सध्या भासू लागला आहे.
 Shortage of foreign exchange for tourism in Pune
Shortage of foreign exchange for tourism in Pune esakal

पुणे : कोरोनानंतर परदेशागमनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांना जवळ बाळगण्यासाठीच्या परकीय चलनाचा तुटवडा सध्या भासू लागला आहे. त्यासाठी दोन किंवा तीन दिवसही थांबण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. मागणी अचानक वाढल्यामुळे हा तुटवडा भासत असल्याचे पर्यटन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे परदेशगमन सुमारे दोन वर्षे थांबले होते. आता निर्बंध बऱ्यापैकी उठले आहेत. त्यामुळे अनेकांचे खडलेले बेत आता मार्गी लागत आहे. त्यातच एप्रिल- मे महिना पर्यटनाचा हंगाम समजला जातो.

सर्वच देशांची विमानसेवा आता बऱ्यापैकी सुरळीत झाली आहे. त्यामुळे अमेरिका, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड तसेच युरोपमधील स्विर्त्झलंड, तुर्कस्तान आदी देशांत जणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटनाला जाताना सोबत ३००० डॉलर्सपर्यंतची रक्कम जवळ बाळगता येते. उर्वरित रक्कम प्री-पेड कार्डद्वारे पर्यटकांना जवळ ठेवता येते. जवळ बाळगणारी परकीय चलनातील रक्कम घेण्यासाठी भारतीय रुपयांत त्यांची खरेदी करावी लागते. त्यासाठी पर्यटकांना पासपोर्ट, पॅनकार्ड आणि संबंधित देशाचा व्हिसा यांची प्रत द्यावी लागते.

पर्यटनाला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सध्या दिऱ्हाम, डॉलर, युरो, पौंड, बाथ यांना भाव आला आहे. पर्यटकांना लगेचच परकीय चलन हवे असल्यास त्यावर २ - ४ टक्के रक्कम अधिक द्यावी लागत आहे. तसेच त्यासाठी २- ३ दिवसही थांबावे लागत आहे. मात्र, कार्ड स्वरूपात परकीय चलन मूळ किंमतीला उपलब्ध होत आहे. परंतु, रोकड स्वरूपात परकीय चलन हवे असल्यास त्यासाठी थांबावे लागत आहे अन काही रक्कमही ऑन स्वरूपात द्यावी लागत आहे.

पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांत वाढले आहे. परिणामी परकीय चलनाची मागणीही वाढली आहे. ऑनलाईन स्वरूपात चलनासाठी फारशी अडचण येत नाही. परंतु, कॅश स्वरूपात चलन जवळ बाळगण्यासाठीच्या स्टॉकमध्ये तुटवडा भासत आहे. काही चलनांसाठी दोन -तीन दिवस पर्यटकांना थांबावे लागत आहे. मागणीच्या तुलनेत आयात कमी असल्यामुळे ही परिस्थिती उदभवली आहे.

- निशिकांत भालेराव (लक्ष्मी फॉरेक्स)

पर्यटन व्यवसाय दोन वर्षांनंतर बहरत आहे, ही सुदैवाची बाब आहे. परंतु, हा व्यवसाय पूर्ववत झालेला नाही. सुट्यांचा हंगाम असल्यामुळे सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे सगळ्याच पूरक गोष्टींची मागणी वाढली असून तुलनेने पुरवठा कमी आहे. परकीय चलनाच्या बाबतीतही तसेच झाले आहे. तरीही पर्यटकांना सुविधा देण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न सुरू आहे.

- झेलम चौंबाळ (केसरी टूर्स)

पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे ....

  • परकीय चलन ‘कॅश’ स्वरूपात मिळण्यावर मर्यादा

  • व्हिसासाठी वेटिंग ; अमेरिकेच्या व्हिसासाठी सप्टेंबर- ऑक्टोबरच्या मुलाखतींचा स्लॉट

  • दूतावासांत व्हिसासाठी प्रलंबित अर्जांचे प्रमाण वाढले

  • हॉटेल्समधील रूमचे भाढे वाढलेले

  • फ्लाईटसमध्ये सीटस मिळविण्यासाठी ओढाताण

- मंगेश कोळपकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com