औषध कंपन्यांच्या धोरणामुळे रेमडेसिव्हिरचा तुटवडा;"केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट'चा आरोप 

औषध कंपन्यांच्या धोरणामुळे रेमडेसिव्हिरचा तुटवडा;"केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट'चा आरोप 

पुणे - औषध निर्माण कंपन्यांच्या वितरणाच्या धोरणांमुळे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा पुणे जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. कंपनीच्या वितरण साखळीतील त्रुटीमुळे हे इंजेक्‍शन सामान्य रुग्णांपर्यंत पोचवण्यात असंख्य अडचणी येत आहेत. त्यातून रुग्णांच्या नातेवाइकांची फरफट होत आहे, असा थेट आरोप "केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट'ने केला आहे. 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"पुण्यात रेमडेसिव्हिर मिळेना' या शीर्षकाखाली बुधवारी "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्या आधारावर "केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट'ने हा आरोप केला. 

कंपन्यांच्या औषध वितरणाच्या चुकीच्या पद्धतीमुळे या औषधांचे वितरणामध्ये गोंधळ उडतो आहे. कंपनीकडून हे औषध डेपोमध्ये येते त्याचवेळी कंपनी कुठल्या हॉस्पिटलच्या औषध दुकानात किती इंजेक्‍शन्सचा पुरवठा करायचा हे ठरवून देते. डिस्ट्रीब्यूटरकडे इंजेक्‍शन आल्यानंतर ते थेट हॉस्पिटलला द्यावे लागते, असे असोसिएशनचे अध्यक्ष सुशील शहा आणि सचिव अनिल बेलकर यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या इंजेक्‍शनच्या वितरणासाठी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍टने विशेष परवाना घेतला आहे. परंतु घाऊक विक्रेत्यांची यामध्ये काही चूक नसताना कंपनीच्या चुकीच्या वितरण प्रणालीमुळे संघटनेला पुरेशा प्रमाणात इंजेक्‍शनचा पुरवठा होत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com