शिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे

डॉ. संदेश शहा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या दुरदृष्टीला मिळते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सर्वांना शिक्षण दिले. मात्र सध्याच्या सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकभरतीवरील बंदी उठविणे तसेच शिक्षकांच्या पेंशनसंदर्भात योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

रयतच्या शताब्धी महोत्सवानिमित्त संस्था निधीतून येथील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयात नवीन पाच खोल्यांचे भूमिपूजन खासदार सुळे, संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, विभागीय अध्यक्ष राम कांडगे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य प्रदिप गारटकर यांच्या हस्ते झाले. यानिमित्त गुरूकृपा मंगल कार्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते 
झाले. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, हणमंतराव वाबळे, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. लहू कदम, महारूद्र पाटील, अमोल भिसे, विठ्ठल ननवरे, नगरसेवक श्रीधर बाब्रस, मुख्याध्यापक आर. आर. पाटील उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, रयत शिक्षण संस्थेने काळानुरूप बदल केल्यामुळे आज आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून संस्थेकडे पाहिले जाते. राज्यातील अठरापगड जाती धर्मातीलयुवापिढीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचविण्याचे स्तुत्य काम संस्था करत आहे.

अनिल पाटील म्हणाले, जिथे शासनाची शाळा नाही, तिथे संस्थेने शाळा उभा केल्याने राज्यातील 17 जिल्ह्यात विद्यादानाचे काम सुरू आहे. संस्थेत 4 लाख 58 हजार विद्यार्थी शिकत आहेत. संस्थेच्या 438 शाळा डिजिटल असून, 360 शाळांमध्ये रयत विज्ञान परिषद सुरू आहे. जगभरातील शास्त्रज्ञांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. टाटा टेक्नोलॉजी तसेच नॅशनल सायन्स पार्कशी संस्थेचा सामंजस्य करार आहे. सॉफ्ट स्कील अंतर्गत 30 हजार विद्यार्थ्यी प्रशिक्षण घेत आहेत. संस्थेच्या जुन्या व नवीन शाळा सुसज्जीकरणासाठी शासनाकडे 500 कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे.

लोकनेते शरद पवार यांची तिसरी पिढी रयतसाठी सक्रीय 
योगदान देत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
विभागीय अध्यक्ष अॅड. राम कांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रदिप गारटकर तर सूत्रसंचलन प्रिया भोंग व योगेश दरेकर यांनी केले. आभार प्रदर्शन विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांनी केले.

Web Title: Should lift the ban on teacher recruitment says Supriya Sule