कारागृह अधिक्षक यु. टी. पवार यांना कारणे दाखवा नोटीस 

court
court

पुणे : गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणे याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश असताना देखील त्याला न्यायालयात हजर करण्यास नकार देणार्‍या येरवडा कारागृहाचे पोलीस अधिक्षक यु. टी. पवार यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच त्याला हजर करण्यासाठी पैसे मागितले असल्याची तक्रार त्यांच्या वकिलांनी केली आहे. 

शनिवारी (ता. 16) गजा मारणेला न्यायालयात हजर करण्याचे आदेश होते. आदेशानुसार पोलीस अधिकारी केंद्रे आणि कर्मचारी आरोपीस घेण्यासाठी येरवडा कारागृहात गेले होते. परंतु, पवार यांनी त्यांना गजा मारणेला न्यायालयात पाठविण्यास नकार दिला. 

पवार यांनी गजा मारणे याला धमकावत तुम्ही मला महिना सुरू केला नाही. तर, सांगितलेल्या वस्तूही पाठविल्या नाहीत. त्यासोबतच तसेही तुम्हाला आत सडविण्याचे आणि तुम्हाला जेलबाहेर न पाठविण्याचे पैसे मिळतात. असे सांगत गजा मारणेकडे पैशांची मागणी केली असल्याचे मारणे याच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.  

माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहे, असा काहीही प्रकार झालेला नाही. न्यायालयाची नोटीस अजून मिळाली नाही. त्यावर लेखी उत्तर देणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com