मराठा आरक्षणाबाबतही तत्परता दाखवा -  उदयनराजे

मराठा आरक्षणाबाबतही तत्परता दाखवा -  उदयनराजे

पुणे  ""मराठा आरक्षणाला सर्वांचाच पाठिंबा आहे; मग ते देण्यासाठी विलंब का होत आहे? या आरक्षणासाठी सरकारकडे इच्छाशक्‍ती नाही किंवा राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारने ऍट्रॉसिटी कायद्याबाबत जी तत्परता दाखवली, तीच तत्परता मराठा आरक्षणाबाबत दाखवावी,'' अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली. 

उदयनराजे यांनी मराठा समाजाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन दिले. आयोगाने लवकर अहवाल सादर करावा. तसेच, ही प्रक्रिया गतीने होण्यासाठी सरकारने आयोगाला पुरेसे मनुष्यबळ पुरवावे, अशी मागणीही त्यांनी केली. 

ते म्हणाले, ""मराठा आरक्षणासाठी राज्यात 58 विराट मूक मोर्चे निघाले. जगातील प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाची दखल घेतली. त्या वेळीच  सरकारने हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला असता, तर अशी परिस्थिती उद्भवली नसती, अनेक तरुणांचे जीव गेले नसते. मराठा मोर्चे थांबले पाहिजेत म्हणता; मग मार्ग का काढत नाही? लोकांसमोर पर्याय नसल्यानेच मोर्चे निघत आहेत. परिस्थिती चिघळण्यास राज्य सरकार जबाबदार आहे.'' 

सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. सरकारने आरक्षणाबाबत तातडीने मार्ग काढावा. केवळ अध्यादेश काढून प्रश्न सुटणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाचे आरक्षण काढा, असेही मी म्हणणार नाही. धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. सत्ताधारी असो की विरोधक, त्यांनी माणुसकीच्या नात्याने हा प्रश्‍न समजून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

समन्वय समितीच्या बैठकीत दिशा ठरणार 
मराठा आरक्षणाबाबत सर्व जिल्ह्यांतील समन्वय समितीच्या प्रमुखांची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत आंदोलनाची दिशा निश्‍चित करण्यात येईल. कोठेही हिंसक घटना होणार नाही, मालमत्तेचे नुकसान होणार नाही किंवा कोणाला त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन खासदार उदयनराजे यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com