सावंतवाडीत प्रांताधिकारी निकम यांचे गावकऱ्यांसमवेत श्रमदान

विजय मोरे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

महसूली स्वतंत्र असलेल्या सावंतवाडी गावाने पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा भाग घेतला आहे. येथे 8 एप्रिलला महाश्रमदान घेण्यात आले होते. 

उंडवडी - सावंतवाडी (ता. बारामती) येथे पानी फाउंडेशन उपक्रमाअंतर्गत बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी गावकऱ्यांसमवेत 
मोठ्या उत्साहात श्रमदान केले. यावेळी मंडल कृषी अधिकारी एम. पी. सय्यद, गावकामगार तलाठी विनोद धापटे, माजी उपसरपंच शरद सावंत, विक्रम सावंत, कैलास सावंत, पोलिस पाटील नितीन गटकळ यांच्यासह पानी फाउंडेशनची टिम व ग्रामस्थांनीही श्रमदान केले. 

सकाळी 7 वाजता श्रमदानाला सुरवात झाली होती. या श्रमदानात गावचा माथा असलेल्या माळारानावर सलग समतल चर (सी. सी. टी) खोदण्यात आली.

महसूली स्वतंत्र असलेल्या सावंतवाडी गावाने पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा भाग घेतला आहे. येथे 8 एप्रिलला महाश्रमदान घेण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील दोन हजार स्वयंसेवकानी श्रमदान केले होते. त्यानंतर दररोज सकाळी गावकरी मोठ्या उत्साहात श्रमदान करतात. याची दखल घेवून बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी एक श्रमदान केले. यावेळी निकम यांनी हातात टिकाऊ घेवून सलग समतल चर खोदली. 

श्रमदानानंतर वयोवृध्दांशी विचारपूस...

येथील श्रमदानात सुरवातीपासून सहभागी असलेले नव्वद वर्षे वयाचे सदाशिव निवृत्ती सावंत व पुतळाबाई सदाशिव सावंत यांच्याशी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी विचारपूस केली. व त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच येथील विविध जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली व आत्तापर्यंत केलेले काम व नियोजन जाणून घेवून गावकऱ्यांचे कौतुक केले. 

या उपक्रमात विविध प्रकारची फळ झाडे व जंगली झाडे लावण्याचा गावकऱ्यांना सल्ला दिला. सावंतवाडी ( ता. बारामती) येथे गावकऱ्यांसमवेत प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी हातात टिकाऊ घेवून श्रमदान केले. 

Water Cup

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Shramdan along with the villagers of Sawantwadi