श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे - पावसाच्या सरी अन्‌ श्रावणी सोमवार असे निमित्त साधत शहरातील ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मंदिरात खास फुलांची सजावट करण्यात आली होती आणि या निमित्ताने मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पावसाच्या सरींतही भाविकांची पहाटेपासूनच मंदिरात रीघ लागली होती. मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा, महाआरतीसह कीर्तन, भजनाचे कार्यक्रम आयोजिले होते.  

सणांचा पवित्र महिना म्हणून श्रावण ओळखला जातो. श्रावणात खासकरून महादेवाची आराधना केली जाते. त्यामुळेच श्रावणात सोमवाराला मोठे महत्त्व आहे. त्याचेच निमित्त साधत श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भक्तांनी शंकर मंदिरात गर्दी केली. शंकराच्या पिंडीवर बेल, फुले आणि दूध वाहून त्यांनी शंकराची आराधना केली. पुण्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरू असूनही भक्तांनी मंदिरात जाण्यावर भर दिला. मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभही भक्तांनी घेतला.

Web Title: Shravan Monday Shiv Temple Bhavik