आई-वडिलांची भक्ती जागवणारा 'श्रावणबाळ'

सचिन शिंदे
शनिवार, 14 जुलै 2018

ज्ञानोबा - तुकोबा ते रोजच जागवत जगत आहेत. लहान मुलाला चाॅकलेट दिले अन् ते परत मागितले. तरी ते परत देत नाही. तर मग मोठ्यांची बातच विसरा. त्या सगळ्या मोहातून बाहेर पडण्यासाठीच भक्तीमार्गाला लागलो, असे सांगणाऱ्या पुलचंद यांनी भक्तीमार्ग त्यांच्या परीने जपण्याचा प्रयत्न केल्याचेही जाणवून गेले.

बारामती : पंढरपूरला मार्गस्थ झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीच्या वेशीवर वरूण राजाने स्वागत केले. त्याच पावसात चालणाऱ्या सत्तरीतील वारकऱ्याने लक्ष वेधले. सहा ते सात महिन्यांपूर्वी नव्वदीतील आई वडिलांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही त्यांच्या आठवणी भक्ती रूपात जागृत ठेवण्यासाठी सत्तरीतील फुलचंद बहिणीसोबत वारीत सहभागी झाले आहेत.

हवेली तालुक्यातील बकुरी गावचे फुलचंद गणपत कायगुडे सोहळ्यात पुढे चालतात. मोक्षाचा मार्ग म्हणजेच भक्ती असे ते आवर्जून सांगतात. पालखी सोहळ्यातील भक्तांच्या मांदीयाळीत फुलचंद यांची वेगळी छाप उमटताना दिसते. सोळा वर्षांपासून पुलचंद न चुकता वारी करतात. सोळा वर्षे पुलचंद वारीत नव्वदीतील  आई वडिलांना घेऊन सहभागी होत होते. बहुतांशी वारकरी त्यांना श्रावणबाळ म्हणून ओळखतो. मात्र सात ते आठ महिन्यापूर्वी महिन्याच्या फरकाने आई वडील वारले. त्यांची भक्ती जागृत ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्धार त्यांनी केला. मात्र त्यासाठी आई-वडिलांच्या जागी त्यांनी बहिणीला वारी घडवण्याचे ठरवले. त्यामुळे ते बहिणीसोबत सोहळ्यात आले आहेत.

घरात तयार केलेला हातगाडा, त्यात चार-दोन मेंढरं, त्यासोबत काळू मामाचा फोटो, फोटोशेजारी आबिर असे त्यांचा हातगाडा अनेकांना आकर्षित करतो. त्या हातगाड्यात बसलेली त्यांची बहीण लक्ष्मी केसरकरही सतत बाळू मामा व विठ्ठलाचा गजर करताना दिसते  मागील वर्षाच्या वारीत बहिणीच्या जागी आई वडील यंदा बहिणीला घेवून निघालेवले फुलचंद यांची विठ्ठलवर निस्सीम भक्ती आहे.

ज्ञानोबा - तुकोबा ते रोजच जागवत जगत आहेत. लहान मुलाला चाॅकलेट दिले अन् ते परत मागितले. तरी ते परत देत नाही. तर मग मोठ्यांची बातच विसरा. त्या सगळ्या मोहातून बाहेर पडण्यासाठीच भक्तीमार्गाला लागलो, असे सांगणाऱ्या पुलचंद यांनी भक्तीमार्ग त्यांच्या परीने जपण्याचा प्रयत्न केल्याचेही जाणवून गेले.  

उंडवडीचा मुक्काम आटोपून बारामतीकडे सकाळी सातच्या सुमारास पालखी सोहळा मार्गस्थ झाला. अकरा किलोमीटरचा टप्पा ओलांडताना सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पालखी सोहळा बऱ्हाणपुराचा विसावा आटोपून मार्गस्थ झाला. तो बारामतीच्या वेशीवर आला अन् तेथे पावसाने जोरदार स्वागत केले.

वरूणराजा चौफेर कोसळू लागला तसा पालखी सोहळ्यातील वारकरीही आनंदित झाला होता. दहा ते पंधरा मिनिट झालेल्या पावसाने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसूच उमटले होते. भाग गेला, शिन गोला अवघा झालेसे आनंद अशीच भावना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

Web Title: Shravanbala is for favors parents