सांगवीत श्रावणमास शिवपुराण कथा व ज्ञानयज्ञ

रमेश मोरे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील वीरशैव लिंगायत समाज व वीरशैव शिवशक्ती महिला मंडळ यांच्या वतीने श्रावण मासा निमित्त शिवपुराण कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शिवभक्त ह भ प रमेश महाराज गणेशपूरे लातूरकर हे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत शिवकथा कथन बारा ज्योतीर्लिंग कथा कथन करत आहेत.

शुभयोग मंगल कार्यालय ढोरे नगर  येथे या शिवपुराण सोहळा रविवार ता.९ सप्टेंबर पर्यंत सुरू रहाणार आहे.  परिसरातील भाविकांनी  या कथा सोहळ्याचा लाभ घ्यावा.  असे वीरशैव लिंगायत समाज संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कानडे व सचिव सोमनाथ कोरे यांनी सांगितले.कथा सोहळ्याचे संयोजन सुरेश दंडवडे, माणिक धूरूपे ,संजय होनराव , महेश टींगरे, बळवंत हांचे, अनिल जोतराव, प्रदीपकुमार देशमुख, भीमाशंकर टोंगळे, अशोक देवणे, विजय केचे हे करत आहेत.
 
Web Title: Shravanmas Shiva Puran Story and Knowledgeable