श्रेया घोषाल "लाइव्ह इन कॉन्सर्ट' पुण्यात 

shreya-ghoshwal
shreya-ghoshwal

पुणे - सुप्रसिद्ध पार्श्‍वगायिका आणि आपल्या सुरेल गायकीनं भारतीय मनांवर अधिराज्य गाजविणारी श्रेया घोषाल हिची पुण्यात 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता विधी महाविद्यालयाच्या मैदानावर "लाइव्ह इन कॉन्सर्ट' आयोजित केली आहे. 
जायबंदी जवानांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या क्वीन मेरीज टेक्‍निकल इन्स्टिट्यूट या संस्थेच्या शताब्दीनिमित्त रिडिफाइन कॉन्सेप्टस यांची "ऋण : अब हमारी जिम्मेदारी' ही संकल्पना देशात राबविली जात आहे. ज्याद्वारे अपंग जवानांसाठी मदत निधी उभारण्याचं सत्कार्य होत आहे, त्याचाच एक भाग म्हणजे ही संगीत रजनी. 

"देवदास' या चित्रपटातील गाण्यांपासून सुरू झालेला श्रेयाचा पार्श्‍वगायकीचा प्रवास रसिकांना मंत्रमुग्ध करून राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कारापर्यंत अधिराज्य गाजवत आहे. "देवदास', "मुन्नाभाई एमबीबीएस', "खाकी', "मै हू ना', "धूम', "परिणिता', "ओमकारा', "क्रिश', "लगे रहो मुन्नाभाई', "हे बेबी', "लागा चुनरी मे दाग', "सलामे इश्‍क', "गुरू'पासून ते अगदी आताच्या "रुस्तम'पर्यंत तब्बल शंभरहून अधिक चित्रपटांसाठी श्रेयाने गायन केले आहे. 

जायबंदी भारतीय सैन्यातील जवानांसाठी क्वीन मेरीज टेक्‍निकल इन्स्टिट्यूट ही सेवाभावी संस्था 99 वर्षांपासून कार्यरत आहे. आपल्या प्रत्येकाच्या संरक्षणार्थ युद्धभूमीवर लढणारे आणि अपंगत्व स्वीकारणारे जवान या संस्थेमध्ये तांत्रिक शिक्षण घेत आहेत. त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी ही संस्था मदत करते. या कार्यक्रमाद्वारे उभा राहणारा निधी या संस्थेच्या शताब्दीनिमित्त दिला जाणार आहे. "ऋण : अब हमारी जिम्मेदारी' हा उपक्रम शताब्दीनिमित्त आणि मदतनिधी उभा करण्यासाठी रिडिफाइन कॉन्सेप्टसतर्फे राबविला जात आहे. या उपक्रमाचा उद्देश क्‍यूएमटीआय या संस्थेच्या व जायबंदी जवानांच्या पुनर्वसनासाठी व्हावा, असा आहे. अंतर्नाद संस्था, मंदार बापट आणि राहुल अभ्यंकर यांची निर्मिती असलेल्या "श्रेया घोषाल कॉन्सर्ट' या कार्यक्रमाची व्यवस्था एस. एच. एंटरप्रायजेस यांची आहे. 

पुण्याचे गायक ऋषिकेश रानडे या वेळी श्रेयाच्या साथीनं गाणार आहेत. लॉईड, की स्टोन, सप्तपदी यांचं सहप्रायोजकत्व असून, "सकाळ माध्यम समूह' प्रायोजक, तर रेडिओ सिटी यांचंदेखील सहकार्य आहे. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक, अण्णाभाऊ साठे, रामकृष्ण मोरे सभागृह यासह "बुक माय शो' या संकेतस्थळावरही तिकीट विक्री चालू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com