श्रेया घोषाल "लाइव्ह इन कॉन्सर्ट' पुण्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पुणे - सुप्रसिद्ध पार्श्‍वगायिका आणि आपल्या सुरेल गायकीनं भारतीय मनांवर अधिराज्य गाजविणारी श्रेया घोषाल हिची पुण्यात विधी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (ता. 11) सायंकाळी 6 वाजता "लाइव्ह इन कॉन्सर्ट' आयोजित केली आहे. यासाठी "सकाळ माध्यम समूह' माध्यम प्रायोजक असून, रावेतकर ग्रुप मुख्य प्रायोजक आहे. 

पुणे - सुप्रसिद्ध पार्श्‍वगायिका आणि आपल्या सुरेल गायकीनं भारतीय मनांवर अधिराज्य गाजविणारी श्रेया घोषाल हिची पुण्यात विधी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (ता. 11) सायंकाळी 6 वाजता "लाइव्ह इन कॉन्सर्ट' आयोजित केली आहे. यासाठी "सकाळ माध्यम समूह' माध्यम प्रायोजक असून, रावेतकर ग्रुप मुख्य प्रायोजक आहे. 

जायबंदी जवानांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या क्वीन मेरीज टेक्‍निकल इन्स्टिट्यूट या संस्थेच्या शताब्दीनिमित्त रिडिफाइन कॉन्सेप्टस यांची "ऋण : अब हमारी जिम्मेदारी' ही संकल्पना देशात राबविली जात आहे. ज्याद्वारे अपंग जवानांसाठी मदत निधी उभारण्याचं सत्कार्य होत आहे, त्याचाच एक भाग म्हणजे ही संगीत रजनी. 

"देवदास' या चित्रपटातील गाण्यांपासून सुरू झालेला श्रेयाचा पार्श्‍वगायकीचा प्रवास रसिकांना मंत्रमुग्ध करून राष्ट्रीय अन फिल्मफेअर पुरस्कारापर्यंत अधिराज्य गाजवत आहे. रावेतकर ग्रुप प्रस्तुत श्रेया घोषाल लाइव्ह इन कॉन्सर्ट व्हॅलेंटाइन डेच्या आसपास होत असल्यामुळे तरुणांचा उत्साही सहभाग पाहायला मिळतो आहे. प्रवेशिकांसाठी 9146602557, 8805983130 या क्रमांकावर संपर्क साधावा. जायबंदी भारतीय सैन्यातील जवानांसाठी क्वीन मेरीज टेक्‍निकल इन्स्टिट्यूट ही सेवाभावी संस्था 99 वर्षांपासून कार्यरत आहे. युद्धभूमीवर लढणारे आणि अपंगत्व आलेले जवान या संस्थेमध्ये तांत्रिक शिक्षण घेत आहेत. त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी ही संस्था मदत करते. या कार्यक्रमाद्वारे उभा राहणारा निधी या संस्थेच्या शताब्दीनिमित्त दिला जाणार आहे. "ऋण : अब हमारी जिम्मेदारी' हा उपक्रम शताब्दीनिमित्त आणि मदतनिधी उभारण्यासाठी रिडिफाइन कॉन्सेप्टसतर्फे राबविला जात आहे. या उपक्रमाचा उद्देश क्‍यूएमटीआय या संस्थेच्या व जायबंदी जवानांच्या पुनर्वसनासाठी व्हावा, असा आहे. 

अंतर्नाद संस्था, मंदार बापट आणि राहुल अभ्यंकर यांची निर्मिती असलेल्या "श्रेया घोषाल कॉन्सर्ट' या कार्यक्रमाची व्यवस्था एस. एच. एंटरप्रायजेस यांची आहे. पुण्याचे गायक हृषीकेश रानडे या वेळी श्रेयाच्या साथीनं गाणार आहेत. लॉइड, की स्टोन, गोखले केटरर्स, सप्तपदी, फिल्ट्रम यांचं सहप्रायोजकत्व असून, रेडिओ सिटी यांचंही सहकार्य आहे. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक, अण्णा भाऊ साठे, रामकृष्ण मोरे सभागृह यासह "बुक माय शो' या संकेतस्थळावरही तिकीट विक्री सुरू आहे.

Web Title: Shreya Ghoshal Live in Concert in Pune