श्री पांडुरंग पालखीसोहळा हडपसरला विसावा घेऊन आळंदीकडे मार्गस्थ

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून निघालेल्या श्री विठ्ठल पालखी सोहळ्याचे परिसरातील भाविकांनी उत्साहात स्वागत केले.
Palkhi Sohala
Palkhi SohalaSakal

हडपसर - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून निघालेल्या श्री विठ्ठल पालखी सोहळ्याचे परिसरातील भाविकांनी उत्साहात स्वागत केले. नामघोषाचा गजर करीत उपस्थितांनी पादुकांवर माथा टेकवत दर्शन घेतले.

काल सासवड मुक्कामी असलेला हा पालखी सोहळा आज दुपारी हडपसर येथे विश्रांतीसाठी थांबला होता. राज्याच्या विविध भागातून आलेल्या अनेक दींड्या या सोहळ्यात सहभागी झालेल्या आहेत. गाडीतळ येथील बंटर शाळेच्या आवारात दुपि पालखी सोहळा विसवला होता. आपापल्या सोयीनुसार ठिकठिकाणी थांबून वारकऱ्यांनी दुपारची न्याहरी घेतली. विविध संस्था, मंडळे व व्यक्तींनी काही दींड्यामधील वारकऱ्यांच्या न्याहरीची व्यवस्था केली होती. यावेळी पादुकांची अभिषेक पूजा झाली. कीर्तन, भजनाने परिसर भक्तीमय वातावरणात चिंब न्हावून निघाला होता. न्याहरीनंतर काही काळ विश्रांती घेऊन हा पालखीसोहळा आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com