Video : श्रीनिवास पाटील म्हणतात, 'अन् मला निवडून यायचा नाद लागला'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

पाटील म्हणाले, " पुण्यात स. प. महाविद्यालयात शनिवार, नारायण, सदाशिव, शुक्रवार पेठेतील 'हिरवळ' होती, तर बीएमसीसी म्हणजे वरड रान होते. हिरवळ म्हणली की, जनावरे येणारच की, मी हिरवळीतला जनरल सेक्रेटरी होतो. माझ्यामुळे कुणाचीही काही करायची ताकद नव्हती, त्यामुळे मुल मला पाडायचा प्रयत्न करत, तर मुली मला निवडून देत होत्या. तेव्हापासून मला निवडून यायचा नाद लागला आहे.'' अशी कोटी करताच सभागृहातील उपस्थितांमध्ये हस्यकल्लोळ झाला. 

पुणे : साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना चित केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षात होतच आहे. पण त्यांनी निवडूकांमध्ये यशस्वी होण्यामागचे गुपीत सांगताना, ''महाविद्यालयात असताना 'हिरवळी' चा भक्कम पाठिंबा असल्याने मला जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून येत होतो, तेव्हापासूनच निवडून यायचा नाद लागला "अशी मिस्कीलपणे टिप्पणी केली. 

निमित्त होते, नामदेवराव मोहोळ विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठान आणि मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळातर्फे आयोजीत मामासाहेब मोहोळ यांच्या 37 साव्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे. संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद मोहोळ, सचिव बाळासाहेब गांजवे, महापौर मुरलीधर मोहोळ, कोषाध्यक्ष दिलीप बराटे, विश्वस्त संग्राम मोहोळ, विश्वस्त रोहिदास मोरे, उद्योजक दत्ता गायकवाड, विश्वस्त आणि माजी खासदार नानासाहेब नवले, ग्रुप कॅप्टन गोविंद आपटे यावेळी उपस्थित होते. 

Image may contain: 4 people

मोदी पुण्यात आले पण, 'हे' काम करायला नाही विसरले 

पाटील म्हणाले, " पुण्यात स. प. महाविद्यालयात शनिवार, नारायण, सदाशिव, शुक्रवार पेठेतील 'हिरवळ' होती, तर बीएमसीसी म्हणजे वरड रान होते. हिरवळ म्हणली की, जनावरे येणारच की, मी हिरवळीतला जनरल सेक्रेटरी होतो. माझ्यामुळे कुणाचीही काही करायची ताकद नव्हती, त्यामुळे मुल मला पाडायचा प्रयत्न करत, तर मुली मला निवडून देत होत्या. तेव्हापासून मला निवडून यायचा नाद लागला आहे.'' अशी कोटी करताच सभागृहातील उपस्थितांमध्ये हस्यकल्लोळ झाला. 

Image may contain: 4 people, people smiling, people standing

'पंतप्रधानांच्या स्वागतापासून राष्ट्रवादीच्या आमदारांना जाणीवपूर्वक दूर ठेवले'

मामासाहेब मोहोळ यांच्या कार्याचा गौरव करताना पाटील म्हणाले, पुर्वीच्या काळी ग्रामीण भागातील लोक आर्थिक समस्येच्या चक्रव्युवाहात अडकले होते. त्यांना बाहेर पडता येत नव्हते. ते ओळखून मामासाहेब मोहोळ यांनी शक्ति आणि बुद्धिची सांगड घालत पुणे जिल्ह्यात शिक्षण आणि आखाड्यांचे जाळ निर्माण केल्याने ग्रामीण भागातील जनतेचे भविष्य उजळले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले पोलिस महासंचालक परिषदेला मार्गदर्शन 

यावेळी बाळासाहेब गिरी, रामदास रोडे आणि लक्ष्मण दरोडे या गुणवंत शिक्षकांचा सत्कार पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव बाळासाहेब गांजवे यांनी, तर सूत्रसंचालन संजय भामरे यांनी केले. आभार विश्वस्त संग्राम मोहोळ यांनी मानले.

'पंतप्रधानांच्या स्वागतापासून राष्ट्रवादीच्या आमदारांना जाणीवपूर्वक दूर ठेवले'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrinivas Patil Share his secret of winning elections