स्वराज्याची वाटणी जातिधर्मांत - डॉ. सबनीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती आणि धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. पण त्या स्वराज्याची आपण सर्वांनी जाती-धर्मात वाटणी करून घेतल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे व्यक्त केले. 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात आयोजित पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्‌घाटन डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील, प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, शहराध्यक्ष हबीब शेख, उपाध्यक्ष महम्मद पटेल, अशरफ सय्यद, साहिल शेख आदी उपस्थित होते. 

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘स्वराज्याला ज्यांचा विरोध होता त्या प्रत्येकाचा विरोध महाराजांनी केला. महाराजांच्या स्वराज्यातील महाराष्ट्राला एकात्म ठेवण्याचे आव्हान आता आपल्यासमोर आहे.’’

अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘देशात संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. यासाठी संविधानाची जागृती आणि अंमलबजावणीची गरज आहे. जातिधर्मामध्ये विखुरलेल्या देशात मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान न देता त्यांना समजून घेतले पाहिजे.

शिवाजी महाराज मुस्लिम किंवा ब्राह्मण विरोधी नव्हते. त्यांचा इतिहास खोट्या संदर्भांनी लिहिला गेला आहे. 
- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Web Title: Shripal Sabnis Talking