शुभमला जपान सरकारकडून संशोधनासाठी मिळाली शिष्यवृत्ती

नागोया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सरकारी विद्यापीठात तो संशोधन विद्यार्थी म्हणून येत्या ऑक्टोबरमध्ये सहभागी होणार
Shubham thorat received research scholarship from Japanese government Vishwakarma Institute of Technology Nagoya Institute of Technology
Shubham thorat received research scholarship from Japanese government Vishwakarma Institute of Technology Nagoya Institute of Technologysakal

पुणे : विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून बी.टेक (मेकॅनिकल) झालेल्या शुभम थोरात याला जपान सरकारकडून प्रतिष्ठित अशी ‘मेक्स्ट’ (मोनबुकागाकुशो : एमईएक्सटी) शिष्यवृत्ती मिळाली आहे. नागोया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सरकारी विद्यापीठात तो संशोधन विद्यार्थी म्हणून येत्या ऑक्टोबरमध्ये सहभागी होणार आहे. शुभमला शिष्यवृत्ती म्हणून दर महिना अंदाजे एक लाख रुपये इतका भत्ता, विद्यापीठ शिक्षण शुल्क आणि प्रवासाचा खर्च हे जपानी शिक्षण, संस्कृती, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मिळणार आहे.

जपानी प्राध्यापक डॉ. मोरिनिशी योहेई यांच्या मार्गदर्शनाखाली कॉमप्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स प्रयोगशाळेत संशोधन करणार आहे. दरवर्षी जपानी सरकार संशोधक विद्यार्थ्यांसाठी आणि जपानी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. परदेशी देशांशी परस्पर समंजसपणा वाढविणे, माणसाशी संपर्क वाढविणे, जपानी विद्यापीठांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतांना बळकटी देणे आणि आंतरराष्ट्रीय बौद्धिक योगदान मिळावे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. शुभम सध्या फोसेको इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये कार्यरत आहे.

या शिष्यवृत्ती अंतर्गत शुभम ‘कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स’ विषयात संशोधन करणार आहे. त्याला संशोधनासाठी तब्बल अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे. पहिल्या सहा महिन्यात त्याला जपानी भाषेचे प्रशिक्षण आणि संस्कृतीची माहिती देखील दिली जाणार आहे. त्याशिवाय सहा महिन्यानंतर संशोधनासह त्याला तेथील विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेता येणार आहे. या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील जपान सरकारकडून करण्यात येणार असल्याचे शुभम याने सांगितले.

‘‘या शिष्यवृत्ती अंतर्गत माझ्या विषयात संशोधन करता येणार आहेच, त्याशिवाय तेथील संस्कृती, भाषा शिकण्याचा अनुभव देखील घेता येणार आहे. संपूर्ण शिष्यवृत्तीच्या काळात पहिल्या सहा महिन्यानंतर अन्य शिक्षण घेण्याची संधी देखील मिळू शकणार आहे. ही शिष्यवृत्ती मिळाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. खूप मोठी संधी मिळणार असल्याचे समाधान आहे.’’

- शुभम थोरात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com