Crime News : पुण्यातील श्वेताचा जीव वाचला असता, जर पोलिसांनी…?; धक्कादायक माहिती आली समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shweta Ranwade murder case police ignored the complaint of a young woman in aundh Pune

Crime News : पुण्यातील श्वेताचा जीव वाचला असता, जर पोलिसांनी…?; धक्कादायक माहिती आली समोर

पुणे: पुण्यातील औंध भागात ९ नोव्हेंबर रोजी एका तरुणाने २२ वर्षीय तरुणीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करत तिची निर्घृण हत्या केली होती. श्वेता रानवडे असे या तरुणीचे नाव. प्रेम संबंधातून ही हत्या करण्यात आली हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. श्र्वेतची हत्या करून आरोपी प्रतीक ढमाले हा फरार होता मात्र दुसऱ्याच दिवशी मुळशी तालुक्यातील टाटा डॅमजवळ त्याने आत्महत्या केली.

प्रतीक आणि श्वेता या दोघांचेही गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि दोघांचे लग्नही ही ठरले होते. मात्र, श्वेता ने प्रतिकची वर्तणूक पाहता काही दिवसाआधी लग्नास नकार दिला होता आणि सगळे सबंध तोडून टाकायला देखील सांगितले होते. हा राग मनात धरत प्रतीक ने श्र्वेतची हत्या केली होती. या संपूर्ण प्रकरणात मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

श्वेता रानवडे ही शिक्षित होती आणि तिने २२ सप्टेंबर रोजी चतु:शृंगी पोलिसांकडे प्रतीक बाबत तक्रार केली होती. पोलिसांनी मात्र या तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही.

पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जामध्ये श्वेताने प्रतिकवर काही गंभीर आरोप केले होते. "मला अनेक वेळा प्रतीक च्या धमक्या येत आहेत", "नाही ऐकलं तर घरात तमाशा घालेल" अशा अनेक प्रकारे प्रतीक मला त्रास देतो आहे असे श्वेता ने तक्रार अर्जात नमूद केले होते.

हेही वाचा: Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात थांबणार? आता केल्या जाणार 'या' उपायोजना

एका महिलेने इतके गंभीर आरोप केले तरीसुद्धा पोलिसांनी या तक्रार अर्जकडे लक्ष दिले नाही. २२ सप्टेंबर ते ९ नोव्हेंबर हा कालावधी जवळपास दीड महिन्याचा आहे मात्र या दरम्यान पोलिसांनी कुठली ही कारवाई केली नाही.

महिला सुरक्षा हा एक गंभीर प्रश्न राज्यात घुमजाव घालत असताना हा प्रकार पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे झाला का असा प्रश्न उपस्थितीत राहतो. महिलांना तक्रार करता यावी पोलिसांशी चर्चा करता यावी यासाठी अनेक पोलिस ठाण्यात विशेषतः महिला पोलिस कर्मचाऱ्यंची नेमणूक करण्यात आली असली तरी या संपूर्ण प्रकारातून एक प्रश्न अनुत्तरित राहतो तो म्हणजे पोलिसांनी तक्रार अर्जावर गांभीर्याने लक्ष दिले असते तर आज श्वेता वाचली असती का?

हेही वाचा: Nitin Gadkari: कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमच्या आई-वडिलांपेक्षा…"

टॅग्स :Pune News