"पुणेकर चोखंदळ; त्यांना योग्य माणसाची किंमत' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे - ""पुणेकर तसे चोखंदळ, त्यांना आपल्यासाठी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणाराच नगरसेवक हवा असतो. त्यामुळे पुणेकरांना पुण्याची किंमत माहीत आहे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवार श्‍याम मानकर यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रभाग 29मधून मानकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांच्या हस्ते महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर त्यांनी घरोघर प्रचाराची रणनीती आखली आहे. 

मानकर म्हणाले, ""शहराचा "स्मार्ट सिटी'त समावेश झाला असला, तरी शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनविण्यासाठी सर्व पुणेकरांचे योगदान आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने झोकून देऊन काम करण्याचा निर्धार केला आहे. म्हणूनच महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. "स्मार्ट सिटी'साठी काम करण्याचे महापालिका हे एक व्यासपीठ आहे.'' 

आपल्या सामाजिक कार्याचा आढावा देताना मानकर म्हणाले, ""अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाच्या माध्यमातून काम केले. त्याची पारख करूनच नगरसेवक होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केले. शहरातील सांस्कृतिक परंपरा अधिक उज्ज्वल करण्यावर भर देणार आहे. आपण मूळचा आणि सच्चा पुणेकर म्हणून शहराची परंपरा, संस्कृतीचे संवर्धन करण्याबरोबरच शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.''

Web Title: shyam mankar prabhag 29