वाढदिवसाच्या दिवशी शिरोळेंना उमेदवारीची भेट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या यादीत सुरवातीपासूनच चर्चेत राहिलेले डेक्कन-जिमखाना मॉडेल कॉलनी प्रभागातील (क्र. 14) सिद्धार्थ शिरोळे यांना वाढदिवसाच्याच दिवशी मिळालेली उमेदवारी ही पक्षाकडून अनोखी भेट ठरली आहे. 

सिद्धार्थ हे पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी शनिवारी (ता. 4) प्रचाराचा नारळ फोडून कार्यकर्त्यांसोबत मतदारांच्या गाठीभेटी घेत आपला 38 वा वाढदिवस साजरा केला. 

या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ""पक्षाच्या आदेशाचे पालन करीत गेल्या शुक्रवारी मी निवडणुकीचा अर्ज भरला. अर्ज कसा भरायचा, तो भरताना कोणती कागदपत्रे जवळ बाळगायची, याची इत्थंभूत माहिती मी आधीच घेतली होती. शनिवारी अर्ज छाननी प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, याची मला खात्री होती. त्यामुळेच वाढदिवसाचा मुहूर्त साधत मी शनिवारी लगेचच प्रचाराचा श्रीगणेशा केला. यंदाचा वाढदिवस हा माझ्यासाठी खरोखरच संस्मरणीय ठरला.'' 

शिवाजीनगर गावठाणातील श्री रोकडोबा मंदिरात दर्शन घेतल्यावर कामगार पुतळ्यापासून सिद्धार्थ यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारास प्रारंभ केला. त्यापूर्वी त्यांनी प्रभाग क्रमांक 14 च्या भाजपच्या पॅनेलमधील अन्य सहकारी उमेदवार ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे आणि स्वाती लोखंडे यांच्यासोबत संयुक्त बैठक घेत प्रचाराची दिशा ठरवली. शिवाजीनगर गावठाणात अनेक घरांना भेटी दिल्यावर सिद्धार्थ यांनी मॉडेल कॉलनी परिसरातील नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

Web Title: Siddharth shirole birthday gift