Vidhan Sabha 2019 : सिद्धार्थ शिरोळेंनी दिला मतदारसंघात भेटीगाठींवर भर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रेंजहिल भागातील प्रभाग 5 आणि 6 मध्ये शिरोळे यांची प्रचारफेरी आयोजित करण्यात आली होती. या भागातील नागरिकांनी उत्साहाने सिद्धार्थ शिरोळे यांचे औक्षण करीत त्यांचे स्वागत केले.

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सिध्दार्थ शिरोळे यांनी प्रचाराचा धडाका लावला असून.मतदारसंघातील नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. विजयदशमीच्या निमित्ताने गोखलेनगर येथील शिवप्रताप मित्र मंडळाच्या दुर्गामाता देवीची पूजा केली व स्थानिक नागरिकांचे आशिर्वाद घेतले.

तसेच लॉ कॉलेज रस्त्यावरील भांडारकर प्राच्चविद्या संशोधन मंदिराच्या आवारात शिरोळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय मॉडेल कॉलनी परिसरातील रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट आणि चित्तरंजन वाटिका या ठिकाणी देखील शिरोळे यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या.

Image may contain: 1 person

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रेंजहिल भागातील प्रभाग 5 आणि 6 मध्ये शिरोळे यांची प्रचारफेरी आयोजित करण्यात आली होती. या भागातील नागरिकांनी उत्साहाने सिद्धार्थ शिरोळे यांचे औक्षण करीत त्यांचे स्वागत केले. उपस्थित नागरिकांनी आपल्या अपेक्षा यावेळी शिरोळे यांना सांगितल्या.

नगरसेविका कार्तिकी हिवरकर यांच्यासोबत विशाल पिल्ले, मुकेश गवळी, बंडू कदम, सुरेंद्र भाटी, श्याम काची, अमर देशपांडे, संजय फेणसे, योगेश बाच्चल, बाळासाहेब दौंडकर, संजय चोरगे, गणेश गुळवे, प्रदीप गायकवाड, आदित्य माळवे, अशोक येनपुरे, योगेश बाचल, रवींद्र साळेगावकर, संदीप काळे, गणेश बगाडे आणि शैलेश बडदे, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित आदी या वेळी उपस्थित होते.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : 'त्यांना साधा एक उमेदवार मिळाला नाही' : चंद्रकांत पाटील

- Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे म्हणाले, हे आहे माझे स्वप्न...

- Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी फसवल्याची राणेंकडून कबुली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddharth Shirole met voters of Shivajinagar Constituency for Maharashtra Vidhansabha 2019