Vidhan Sabha 2019 : भाजपचा विश्वास मी सार्थ ठरवेन : सिद्धार्थ शिरोळे

टीम ईसकाळ
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कामाची दखल घेत यावेळी विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून संधी दिली याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.  

पुणे : भारतीय जनता पक्षाने पुणे शहरातील शिवाजीनगर मतदार संघातून पक्षाची उमेदवारी देत माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. पक्षाने मला याआधी पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक आणि पुणे महानगर प्राधिकरण महामंडळचा संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली होती त्यावेळी मी केलेल्या कामाची दखल घेत यावेळी विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून संधी दिली याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.  

Vidhan Sabha 2019 : भाजपची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मी आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केलेल्या कामाबरोबरच मी करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मतदार पाठिंबा आणि आशीर्वाद देत मला प्रचंड बहुमताने विजयी करतील असा माझा विश्वास आहे, असेही सिद्धार्थ यांनी यावेळी सांगितले. 

Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'तरीही मी अर्ज भरलाय'

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राला भाजपच्या उमेदवार यादीची उत्सुकता लागली होती. आज, भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत 125 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: siddharth shirole reaction after bjp candidacy from shivajinagar assembly constituency