शिवाजीनगर : भाजपने गड राखला; सिद्धार्थ शिरोळे विजयी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

Election Results 2019  : एकोणीसाव्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना १७३ मतांची बढत होती. मात्र, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता येथील हक्काच्या मतदारांनी भाजपला साथ दिली. त्यामुळे विसाव्या व शेवटच्या फेरीत शिरोळे यांना ५१४९ मतांची मोठी बढत मिळाली. त्यामुळे शिरोळे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

Vidhan Sabha 2019 : पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीनंतर काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी बाजी मारुन विजय मिळविला आहे. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा प्रथमच उतरले होते. अखेरच्या फेरीत सिद्धार्थ शिरोळे यांनी ५१४९ मते मिळवून विजय खेचून आणला.

शिवाजीनगर : शिरोंळेवर दत्ता बहिरट यांची आघाडी 
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 'काटे की टक्कर' अशी निवडणूक पहायला मिळाली. पहिल्या चार फेऱ्या दत्ता बहिरट हे शिरोळे यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर भाजपने या मतदारसंघात आघाडीवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील चुरस वाढली आहे. 
शिवाजीनगर : शिरोंळेची पुन्हा मुसंडी; बहिरट यांना टाकले मागे

भांडारकर रोड, प्रभात रोडने शिरोळेंना तारले, विजय निश्चित

एकोणीसाव्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना १७३ मतांची बढत होती. मात्र, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता येथील हक्काच्या मतदारांनी भाजपला साथ दिली. त्यामुळे विसाव्या व शेवटच्या फेरीत शिरोळे यांना ५१४९ मतांची मोठी बढत मिळाली. त्यामुळे शिरोळे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. आणखी सुमारे १५०० मतांच्या तीन पेट्या व १५०० पोस्टल मतदान याची मोजणी सुरू आहे. परंतू शिरोळेंचे मताधिक्या अधिक असल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddharth shirole Won In Shivaji Nagar For Maharashtra Vidhan Sabha 2019