सिध्देश्वर निंबोडीला डाँक्टरांचे श्रमदान

संतोष आटोळे
गुरुवार, 17 मे 2018

शिर्सुफळ- बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथे बारामती शहरातील मेडिकोज गिल्डच्या सर्व डाँक्टरांनी ग्रामस्थाबरोबर श्रमदान केले. यामुळे रुग्ण सेवेबरोबरच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असल्याचे या डॉक्टरांनी दाखवुन दिले. या दोन तासाच्या श्रमदानात सर्वांनी मिळुन तब्बल 530 मीटर कंटुर (दगडी) बांध घातला यामुळे पाणी अडण्यास व जिरण्यास मदत होणार आहे.

सिध्देश्वर निंबोडी गावने पाणी पाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. यामाध्यमातुन गावामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधबंदिस्ती, सलग समतल चर, माती बांध, ओढे नाले खोलीकरण, तलाव गाळ काढणे, रोपवाटिका, शोषखड्डे यासारखी कामे श्रमदान, तसेच मशिनच्या माध्यमातुन केली जात आहेत. यावेळी गाव परिसरातील डोंगर माथ्यावर जवळ जवळ 530 मीटरचा दगडी बांध रचण्यात आला. यावेळी अगदी 9 वर्षांच्या कु. ईश्वरी पिल्ले पासुन ते 80 वर्षांच्या डॉ के.डी.गुजर पर्यंत सर्वांनी झोकुन देऊन काम केलं. 

बाहेरचे लोक येऊन काम करतात म्हटल्यावर गावातलीही बरीच मंडळी आपल्या कुटुंबासहीत माळारानावर येऊन खांदयाला खांदा लावुन काम करू लागली असे सुखावह चित्र पहायला मिळाले. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हाच या कामाचा मोबदला अशी प्रतिक्रीया उपस्थित डाँक्टरांनी दिली. या श्रमदानात डाँ.उल्हास टुले, टुले मॅडम, डॉ संताजी शेळके, डॉ सनी मुथा, डॉ आनंद हारके, डॉ वृषाली हारके, शार्दुल हारके, डॉ अश्विन वाघमोडे, डॉ शुभांगी वाघमोडे, डॉ राकेश मेहता, डॉ संतोष घालमे, डॉ अपर्णा घालमे, स्वयम घालमे, डॉ सुजाता चव्हाण, चंद्रसेन चव्हाण, डॉ के डी गुजर, ईश्वरी पिल्ले, डॉ वैशाली पिल्ले, डॉ चंद्रकांत पिल्ले, बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे राजेंद्र गोफणे, संग्राम तावरे, दिपक काटे  यांच्यासह सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते ग्रामसेवक रंजना आघाव यांनी या श्रमदानात सहभाग घेतला.

Web Title: Siddheshwar Nimbodili doctors help in water cup competition