Vidhan Sabha 2019 : शिवाजीनगर मतदार संघ पिंजून काढत सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार

Sidharth Shirole campaigning in Shivajinagar constituency
Sidharth Shirole campaigning in Shivajinagar constituency

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे आपला मतदार संघ पिंजून काढत आहेत.

गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये सिद्धार्थ शिरोळे हे संपूर्ण मतदार संघामध्ये पदयात्रा, प्रचारफे-या याबरोबर विविध समाजाचे मेळावे, मंदिरे, गुरुद्वारा आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत त्या त्या भागातील नागरिकांशी संवाद देखील साधत आहेत.

तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर : सिद्धार्थ शिरोळे

आजही शिवाजीनगर मधील पुलाची वाडी, खंडोजीबाबा चौक, खिलारे वसाहत या ठिकाणी पदयात्रेद्वारे त्यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन शुभ आशीर्वाद घेतले. या वेळी नागरीकांनीही त्यांच्या पाठीवर हात ठेवीत आपल्या अपेक्षा त्यांना मनमोकळेपणाने सांगितल्या.

शिरोळेंनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

 भाजपा शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, नगरसेविका नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, दीपक पोटे,श्याम सातपुते, शिरीष आपटे, स्वाती लोखंडे, अतुल दिघे, अनिरुद्ध पायगुडे, जालिंदरनाथ मोरे, रवींद्र मोरे, भूषण देवकर, मोहन दिघे, राम दिघे, अतुल दिघे, दत्ता खंडाळे, जितू मंडोरा आदी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com