#PuneMetro पुणे : मेट्रोचे सिग्नल पूर्णत्वाकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

  • पिंपरी ते फुगेवाडीदरम्यान ७० टक्के काम पूर्ण
  • मार्चअखेरीस या मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्‍यता 
  • वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यान ५० टक्के काम पूर्ण 
  • किमान आणखी दोन महिने हे काम पूर्ण होण्यासाठी लागणार

पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन्ही मार्गांवरील ‘प्रायॉरिटी सेक्‍शन’मध्ये सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात येईल. 
- मनोज गुरुमुखी, कार्यकारी संचालक, महामेट्रो

पुणे - मेट्रो मार्गावर सिग्नल आणि कम्युनिकेशन यंत्रणा बसविण्याचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रो ऑपरेटरला पुढे आणि मागे किती ट्रेन आहेत आणि त्यांचा वेग काय आहे, याचीही माहिती या यंत्रणेमार्फत मिळणार आहे. त्यासाठी अद्ययावत प्रणाली उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-स्वारगेट मार्गावर पिंपरी ते फुगेवाडी आणि वनाज-रामवाडी मार्गावर वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यान ‘प्रायॉरिटी सेक्‍शन’मध्ये मेट्रो अल्पावधीत धावणार आहे.

पुणे : नवी पेठेत रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग 

त्यासाठी खांब उभारणी आणि त्यावर गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता सिग्नलिंगचे काम सुरू आहे. महामेट्रोने त्यासाठी सुमारे २७० कोटी रुपयांची तरतूद केली असून, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये काम सुरू झाले आहे. त्यात ‘कंटिन्युअस ऑटोमॅटिक ट्रेन कंट्रोल’ (सीएटीसी) आणि ‘कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन्स कंट्रोल’ (सीबीटीसी) या अत्याधुनिक प्रणालींचा वापर केला जात आहे. त्यामुळे मध्यवर्ती नियंत्रण कक्षाला आणि ट्रेन ऑपरेटरला कोणत्या मार्गावर किती ट्रेन आहेत, त्यांचा वेग किती आहे, त्यांच्यात अंतर किती आहे. याबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे एकाच मार्गावर तीन ते चार मेट्रो धावू शकतात. ही यंत्रणा ‘ऑप्टिकल फायबर केबल’ आणि ‘रेडिओ कम्युनिकेशन’द्वारे मार्गावरील स्थानकांशी जोडलेली असते. त्यासाठी बोगीच्यावर एक अँटेना लावलेला असतो. या माध्यमातून ही यंत्रणा काम करते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signals of the pune metro to perfection