शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीत लक्षणीय घट; संख्या निम्म्याने कमी

Scholarship
Scholarship

पुणे : शालेय शिक्षण घेताना शिष्यवृत्ती परीक्षा म्हटली की एक वेगळेच महत्त्व असते. शाळा देखील हौसेने विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसविण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु यंदा वर्षभर ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरी शाळा बंद होत्या. त्यामुळे यंदा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरवर्षी साधारणपणे पाचवी आणि आठवीचे जवळपास १० लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंद होत असते. परंतु यंदा ही संख्या सहा-सात लाखांच्या आसपास आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सहा लाख २८ हजार ६३० विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये होते. यंदा कोरोनामुळे ही परीक्षा २३ मे रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील ४७ हजार ६१२ शाळांनी नोंदणी केली आहे. इयत्ता पाचवीसाठी तीन लाख ८६ हजार ३२८ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. तसेच पाच हजार ८३८ जणांनी शुल्क न भरल्याने नोंदणी प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. तर इयत्ता आठवीसाठी दोन लाख ४२ हजार ३०२ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून पाच हजार चार जणांनी नोंदणी शुल्क न भरल्याने अद्याप पूर्ण झालेली नाही.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी होणार
इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी शिष्यवृतती परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा २३ मे २०२१ रोजी होणार आहे.

‘‘दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीचे जवळपास दहा ते बारा लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंद होते. मात्र यंदा गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी गेल्या काही वर्षाच्या तुलनेत कमी झालेली आहे.’’
- तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

  • -शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्या शाळा : ४७,६१२
  • - इयत्ता पाचवीचे नोंदणी झालेले विद्यार्थी : ३,८६,३२८
  •  मुलांची संख्या : १,८२,७०७
  •  मुलींची संख्या : २,०३,६२१
  • - इयत्ता आठवीचे नोंदणी झालेले विद्यार्थी :२,४२,३०२
  •  मुलांची संख्या : १,०५,६४३
  •  मुलींची संख्या : १,३६,६५९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com