esakal | कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरण साठ्यात लक्षणीय वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

वडज धरण शंभर टक्के

कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरण साठ्यात लक्षणीय वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणात आज सायंकाळी चार वाजेपर्यंत २२.०७७ टीएमसी (७४.३९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला असून प्रकल्पा अंतर्गत डिंभे, वडज धरणात शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. मागील वर्षी कुकडी प्रकल्पात आज अखेर २१.५२४ टीएमसी (७२.५३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने कुकडी प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठयात लक्षणीय वाढ झाली आहे. अशी माहीती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

हेही वाचा: माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांच्या प्रेरणेतून ५ हजार महिला आत्मनिर्भर

कुकडी प्रकल्पा अंतर्गत असलेल्या येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे या प्रमुख पाच धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता ३० टीएमसी आहे. या प्रकल्पाव्दारे जुन्नर,आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्यातील शेती सिंचनासाठी होतो. रब्बी हंगामातील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे.जून अखेर प्रकल्पात २.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मागील एक महिना पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत होती.

हेही वाचा: नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावरुन रंगले श्रेयाचे राजकारण

मात्र मागील तीन दिवसांत प्रामुख्याने डिंभे,माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून लाभधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.प्रकल्पा अंतर्गत डिंभे, वडज धरणात शंभर टक्के तर पिंपळगाव जोगे धरणाचा अपवाद वगळता इतर धरणात पन्नास टक्क्यां पेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणात आज सायंकाळी चार वाजेपर्यंत झालेला उपयुक्त पाणी साठा टीएमसी (कंसात टक्के): येडगाव: १.१४३ (५८.८४ ),माणिकडोह: ५.४९० (५३.९५ ),वडज: १.१७४ (१०० ), डिंभे १२.४९५ (१०० ),पिंपळगाव जोगे : १.७७२ (४५.५७)

loading image
go to top