"मातीविना भाजीपाला, चारा' जाणून घ्या उत्पादनाचे तंत्र 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

सकाळनगर, बाणेर रोड, पुणे येथे प्रशिक्षण होईल. प्रति व्यक्ती आठ हजार रुपये शुल्क आहे. आगाऊ नोंदणी करणे आवश्‍यक आहे. संपर्क ः 8605699007 

पुणे - मातीविना भाजीपाला, हिरवा चारा उत्पादनासाठी "हायड्रोपोनिक' हे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान आहे. याद्वारे कमी खर्चात, कमी पाण्यात, अल्प मनुष्यबळात, थोड्या जागेत अतिशय दर्जेदार उत्पादन घेता येणे शक्‍य आहे. सध्या देशातच नव्हे, तर जगभरात याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. फळभाज्या, पालेभाज्या, परदेशी भाजीपाला, जनावरांसाठी चारा उत्पादन आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने कसे घ्यावे, त्याचा वापर कसा करावा, उत्पादनाचे व्यवस्थापन, आवश्‍यक बाबींसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणारे चारदिवसीय प्रगत प्रमाणपत्र प्रशिक्षण 28 ते 31 जानेवारीदरम्यान आयोजिले आहे. भाजीपाल्याबरोबरच या तंत्राने दहा दिवसांत जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत असल्याने दुधाळ जनावरांचा गोठा असणारे, शेळीपालकांसाठी हे तंत्रज्ञान उपयोगी ठरणारे आहे. प्रशिक्षणात हायड्रोपोनिक पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला तसेच चारा उत्पादन युनिटला दोन शिवारफेरींचे आयोजन आहे. सकाळनगर, बाणेर रोड, पुणे येथे प्रशिक्षण होईल. प्रति व्यक्ती आठ हजार रुपये शुल्क आहे. आगाऊ नोंदणी करणे आवश्‍यक आहे. संपर्क ः 8605699007 

पर्यटन व्यवसायातील संधींचे करा सोने 
पर्यटनासाठी लाखो लोक देश-विदेशात जात येत असतात. यासाठी चांगली सेवा मिळावी म्हणून त्यांचा योग्य कंपनीकडे ओढा असतो. त्यामुळे हा व्यवसाय वेगाने वाढत असून, यात नवनवीन संधी निर्माण होत आहेत. हे लक्षात घेता हा व्यवसाय कसा सुरू करावा, नियोजन कसे करावे, ट्युरिझम बेसिक, इको व रिजनल ट्युरीझम, डेस्टीनेशन मार्केट आणि मॅनेजमेंट, प्रॉडक्‍ट अँड सर्व्हिसेस, ट्रॅव्हल एजन्सी कशी सुरू करावी आदी विषयांवर मार्गदर्शन करणारे पाचदिवसीय प्रशिक्षण 14 जानेवारीपासून दर शनिवारी-रविवारी आयोजिले आहे. तसेच फिल्ड व्हीजिटचे आयोजनही केले आहे. प्रति व्यक्ती नऊ हजार शुल्क आहे. वर्किंग प्रोफेशनल्स, आयटी प्रोफेशनल्स, विद्यार्थी, ज्यांना पर्यटन व्यवसाय सुरू करायचा आहे, अशांसाठी कोर्स फायदेशीर आहे. 
संपर्क - 8888839082

Web Title: silc workshop for agriculture