Vidhan Sabha 2019 : पिरंगुटमधील मतदार केंद्रांवर सकाळी 9 वाजेपर्यंत शुकशुकाट

silence at Polling booth till 9 am in Pirangut
silence at Polling booth till 9 am in Pirangut

Vidhan Sabha 2019 : पिरंगुट (मुळशी) : येथील परिसरातील विविध मतदान केंद्रांत सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर शुकशुकाटच होता. अतिशय धिम्या गतीने मतदान सुरू होते. पावसाने उघडीप दिल्याने मतदान प्रक्रिया पार पडणाऱ्या यंत्रणेला दिलासा मिळाला आहे येथील मतदानाची आकडेवारी वाढण्यास मदत होईल, अशी आशा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

पिरंगुटला सकाळपासून तुरळक स्वरुपात मतदनाला सुरवात झाली तर, लवळे येथेही मतदानाला येणाऱ्या मतदारांचे प्रमाण अत्यल्प होते. लवळे येथील तीनही मतदान केंद्रांवर  अपवाद वगळता शुकशुकाट होता.  

सकाळी नऊ वाजता पिरंगुट, लवळे व  कासार आंबोली येथे तीन टक्के मतदान झाले. नांदे येथे मात्र मतदारांत उत्साह असल्याने ८.५ टक्के मतदान झाले. भरे येथे पाच टक्के मतदान झाले.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com