रसीलाच्या खुनाच्या निषेधार्थ हिंजवडीत ‘मूक कॅन्डल मार्च’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पिंपरी - हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीतील संगणक अभियंता तरुणी रसीला राजू ओपी हिच्या खुनाच्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी इन्फोसिस आणि विप्रो कंपनी परिसरात आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी ‘मूक कॅन्डल मार्च’ काढून श्रद्धांजली अर्पण केली.

रविवारी (ता. २९) रात्री नऊच्या सुमारास सुरक्षारक्षकाने रसीलाचा खून केला होता. सुटीच्या दिवशी एकट्या महिला कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविणे, महिला सुरक्षारक्षकांचा अभाव, व्यवस्थापकांचे तक्रारीकडे दुर्लक्ष व महिलांमधील असुरक्षिततेची भावना अशा अनेक प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी मूक कॅन्डल मार्च काढण्यात आला. रसीलाच्या आठवणींनी सहकाऱ्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

Web Title: Silent candle March