कठुआ, उन्नाव प्रकरणांच्या निषेधार्थ बारामतीत मूकमोर्चा

मिलिंद संगई
मंगळवार, 17 एप्रिल 2018

बारामती (पुणे) : जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील आठ वर्षीय आसिफा, उत्तरप्रदेशमधील उन्नाव आणि गुजरातमधील सुरत येथील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा देऊन त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी नागरिक व विविध संघटनासह अखंड भारत जनजागृती मोर्चाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.

मै भारत की बेटी आसिफा.. मुझे इन्साफ चाहिये अशी साद घालत आज बारामतीत हजारो नागरीकांनी रस्त्यावर उतरून कठूआ, उन्नाव आणि अन्य ठिकाणच्या पीडितांना न्याय देण्याची मागणी केली. या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत यासाठी शासनाने कठोर पाउले उचलण्याची आग्रही मागणी या मूक मोर्चाद्वारे करण्यात आली. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवत मूकमोर्चाला पाठींबा दिला.

आज शहरातील मुजावरवाडा येथून सुरु झालेला हा मोर्चा कसबा, गुणवडी चौक, गांधी चौक येथून भिगवण चौकात आला. या मोर्चात शहरातील नागरिकांसह विविध संघटना, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

बारामती नगरपरिषदेसमोर मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या मुलीने कविता सादर करत पिडीत मुलींची व्यथा मांडली. तर अनेक मुलीनी मनोगत मांडले. काश्मीरमधील अत्याचार पीडितांना न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करतानाच संबंधित गुन्हेगाराच्या समर्थनार्थ मोर्चा काढणे ही देशातील तमाम मुलींच्या मातापित्यांचा आणि संविधानाचा अपमान असल्याची भावना अलिशा नसीर बागवान या विद्यार्थीनीने व्यक्त केली.

मागण्यांचे निवेदन खुदैजा सिकंदर शेख या विद्यार्थीनीने वाचून दाखवले. प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी निवेदन स्विकारले. 

Web Title: silent rally against unnav and kathua rape case