11 किलो चांदी आणि 22 ग्रॅम सोने तुळजाभवानीला समर्पित

जगदीश कुलकर्णी
सोमवार, 16 जुलै 2018

पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर व सराफ व्यावसायिक कैलास भांबुर्डेकर यांनी ही मूर्ती तुळजाभवानी मातेला अर्पण केली. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास श्री. भांबुर्डेकर हे पिंपरी चिंचवड भागातील जवळपास चारशे सराफ आणि सुवर्णकारांसमवेत तुळजापूर शहरात दाखल झाले.

तुळजापूर - तुळजाभवानी मातेला पिंपरी चिंचवड (पुणे) येथील एका सराफ व्यावसायिकाने चांदीची ११ किलो वजनाची मूर्ती सोमवारी (ता. १६) अर्पण केली.

पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर व सराफ व्यावसायिक कैलास भांबुर्डेकर यांनी ही मूर्ती तुळजाभवानी मातेला अर्पण केली. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास श्री. भांबुर्डेकर हे पिंपरी चिंचवड भागातील जवळपास चारशे सराफ आणि सुवर्णकारांसमवेत तुळजापूर शहरात दाखल झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढली. रथामध्ये तुळजाभवानी मातेची मूर्ती ठेवून काढण्यात आलेली ही मिरवणूक दुपारी साडेबाराच्या सुमारास तुळजाभवानी मंदिरात आली. त्यानंतर श्री. भांबुर्डेकर यांनी चांदीची ११ किलो वजनाची तुळजाभवानी मातेची मूर्ती आणि २२ ग्रॅम सोन्याचे दागिने तुळजाभवानी देवस्थान समितीचे सरव्यवस्थापक राहुल पाटील, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्याकडे सुपूर्द केले. मनीमंगळसूत्र, सोन्याची नथ, जोडवे आदी वस्तू तुळजाभवानी मातेला देण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली असल्याचे श्री. भांबुर्डेकर यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: silver and gold have been dedicated to Tuljabhavani