esakal | बारामतीकर...सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय...अन् कोरोनाचा आवाज...
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीकर...सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय...अन् कोरोनाचा आवाज...

कोरोनाच्या संकटाच्या काळात बारामतीचे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय आता बारामतीकरांसाठी वरदान ठरणार आहे. शंभर खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामध्ये आता ऑक्सिजनच्या सुविधेसह वीस खाटांचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित झाल्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

बारामतीकर...सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय...अन् कोरोनाचा आवाज...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोनाच्या संकटाच्या काळात बारामतीचे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय आता बारामतीकरांसाठी वरदान ठरणार आहे. शंभर खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामध्ये आता ऑक्सिजनच्या सुविधेसह वीस खाटांचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित झाल्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासकीय रुग्णालय असल्याने भरमसाठ बिलांपासून रुग्णांची येथे सुटका होणार असून त्यांना येथे विनामूल्य उपचार मिळतील.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीचे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय शंभर खाटांच्या क्षमतेचे व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रुग्णालयाची भव्य इमारत असल्याने या रुग्णालयातील सर्व बेड ऑक्सिजनच्या सुविधेने परिपूर्ण करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्या नुसार 24 ऑगस्ट रोजी या कामाची वर्क ऑर्डर दिली गेली. कोरोना संकटामुळे सगळीकडूनच या कामाची मागणी असल्याने तसेच याचे काही सुटे भाग बाहेरून येत असल्याने कामाला काहीसा विलंब झाला, तरिही अवघ्या तीन आठवड्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्णत्वास नेण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई व उपविभागीय अभियंता विश्वास ओहोळ यांनी दिली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
या रुग्णालयातील 66 बेडसची ऑक्सिजन सुविधा कार्यान्वित झालेली असून येते वीस खाटांच्या अतिदक्षता विभागाचेही काम पूर्ण झालेले असून येत्या दोन दिवसात रुग्णांवर येथे उपचार सुरु होऊ शकतील. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे असे 66 तर ज्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचारांची गरज आहे असे 20 संपूर्ण विनामूल्य येथे उपचार घेऊ शकतील. 

रुई रुग्णालयावरील ताण कमी होईल-
सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या ऑक्सिजन सुविधा व अतिदक्षता विभागाचे काम सुरु झाल्यामुळे आता रुई ग्रामीण रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे. येथे आता आरटीपीसीआर स्वॅबचेही नमुने संकलित केले जात असल्यामुळे आता सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय बारामतीकरांसाठी महत्वाचे ठरु लागले आहे. 

अतिदक्षता विभागाच्या 20 खाटांचे काम वेगाने सुरु असून तेही कोरोना रुग्णांसाठी येत्या दोन दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. येथील विभाग सुरु झाल्यानंतर किमान 20 रुग्णांना  येथे दाखल केले जाऊ शकेल.- डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, बारामती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा