आईच्या संस्काराचा काम करताना फायदा - सई परांजपे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

पुणे - ""बीएचे शिक्षण घेत असताना आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आकाशवाणीवर काम करायचे म्हणजे उच्चार स्पष्ट हवेत. लहान असतानाच आईने संस्कृत श्‍लोकाचे पाठांतर करून घेतल्यामुळे त्याचा उपयोग त्यांना आकाशवाणीवर काम करताना झाला,'' अशा भावना सई परांजपे यांनी व्यक्त केल्या. 

माझा देवावर विश्‍वास नाही, माझ्या घरी देव्हारा नाही; पण संस्कृत श्‍लोक म्हणून मी देवांना बोलावू शकते, अशा त्यांच्या अनेक किश्‍श्‍यांमुळे सभागृहात हास्याचे फटाके फुटत होते. निमित्त होते अक्षरधारा, राजहंस प्रकाशन व मांडके हिअरिंग सर्व्हिसेसतर्फे आयोजित चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपेलिखित "सय' या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन व मुलाखतीचे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून त्यांच्या कलाजीवनाचा प्रवास उलघडत गेला. शिस्तप्रिय आई, आजोबा यांचा त्यांच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले. लहानपणीचा केलेल्या बाहुला-बाहुलीच्या लग्नाचा प्रसंग अगदी यथासांग वर्णन करून त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले; तसेच परांजपे यांनी कॉलजेच्या जीएसच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी कशी निवडून आले आणि पुढे जाऊन ड्रामा सेक्रेटरी म्हणून कशी पडले, हा किस्साही त्यांनी सांगितला. रसिका राठिवडेकर यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Simply use while working mother-paranjpe