पुणे मार्केट यार्डात सिमरनचा गोडवा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

चवीला गोड असलेल्या सिमरन फळाचा हंगाम मार्केट यार्डातील फळबाजारात बहरला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून या फळाची आवक होत आहे. सध्या दररोज बारा ते चौदा किलोच्या ८० ते १०० पेट्या बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत. रविवारी याची जास्त आवक होत आहे.

मार्केट यार्ड - चवीला गोड असलेल्या सिमरन फळाचा हंगाम मार्केट यार्डातील फळबाजारात बहरला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून या फळाची आवक होत आहे. सध्या दररोज बारा ते चौदा किलोच्या ८० ते १०० पेट्या बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत. रविवारी याची जास्त आवक होत आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम वेळेत सुरू झाला आहे. या फळाला शहरासह उपनगरांतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते दहा टक्क्यांनी भाव जास्त आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या फळांचा दर्जा चांगला आहे. भारतात अनेक ठिकाणी लग्नकार्यासह, विविध कार्यक्रमांत या फळाचा  खाण्यासाठी वापर होतो. 
- सलिम बागवान, व्यापारी, मार्केट यार्ड

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simran Fruit in pune Market yard