पुण्यात नेत्रशस्त्रक्रियेसाठी ‘सिम्युलेशन’

डोळ्यांची नव्याने शस्त्रक्रिया शिकणाऱ्या डॉक्टरांमध्ये अचूकता आणि नेमकेपणा याला सर्वाधिक महत्त्व असते.
Simulation
Simulationsakal
Summary

डोळ्यांची नव्याने शस्त्रक्रिया शिकणाऱ्या डॉक्टरांमध्ये अचूकता आणि नेमकेपणा याला सर्वाधिक महत्त्व असते.

पुणे - डोळ्यांची (Eye) नव्याने शस्त्रक्रिया (Surgery) शिकणाऱ्या डॉक्टरांमध्ये (Doctor) अचूकता आणि नेमकेपणा याला सर्वाधिक महत्त्व (Important) असते. कारण, रुग्ण विश्वासाने आपला डोळा नेत्ररोगतज्ज्ञांच्या हातात देत असतो. रुग्णाचा हा विश्वास सार्थ ठरण्यासाठी आवश्यक असतो, तो डॉक्टरांचा शस्त्रक्रियेचा सराव. या सरावासाठी आता पुण्यातील ‘एनआयओ’मध्ये नेत्रशस्त्रक्रियेचे सिम्युलेशन (Simulation) उपकरण बसविण्यात आले आहे. असे उपकरण बसविणारे ‘एनआयओ’ राज्यातील पहिले आणि देशातील पाचवे नेत्ररोग रुग्णालय ठरले आहे.

या सिम्युलनेशन उपकरणाचे उद्‍घाटन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ‘एनआयओ’चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर, अरुणा केळकर, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. जाई केळकर उपस्थित होते. डॉ. श्रीकांत केळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सिम्युलेशन उपकरण म्हणजे काय?

नवोदित वैमानिकाच्या हातात थेट विमान दिले जात नाही. सुरवातीला त्याच्याकडून सिम्युलेशनवर सराव करून घेतात. त्याच प्रमाणे रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सिम्युलेशन नवोदित नेत्रशल्यचिकित्सक सराव करतात. हे उपकरण हुबेहूब रुग्णाच्या डोळ्याप्रमाणे असते. त्यावर डोळ्याची कोणती शस्त्रक्रिया कशा पद्धतीने करावी याचा सराव करता येतो. यापूर्वी वेगवेगळ्या प्राण्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून डॉक्टर अभ्यास करत होते. आता सिम्युलेशनमुळे रुग्णाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करत आहोत, असे हे वैशिष्ट्यपूर्ण उपकरण आहे.

Simulation
बारामती नगरपालिका प्रक्रीया केलेल्या पाण्याच्या विक्रीतून उत्पन्न मिळविणार

डॉक्टरांसाठी उपयुक्त...

  • डोळ्यांची शस्त्रक्रियेतील अचूकता वाढते

  • शस्त्रक्रियेतील तांत्रिकता व्यवस्थित आत्मसात करता येते.

  • प्रत्यक्ष रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा आत्मविश्वास वाढतो

  • तज्ज्ञ डॉक्टरांनाही शस्त्रक्रियेतील कौशल्य वाढविण्यासाठी उपयुक्त

रुग्णांना होणारा फायदा...

  • शस्त्रक्रियेतील अचूकता आणि नेमकेपणाचा फायदा होतो

  • शस्त्रक्रिया कशी होणार, हे समजावून सांगता येते

  • डॉक्टरांचे शस्त्रक्रिया कौशल्य वाढल्याचे गुंतागुंत होत नाही

आधुनिक काळात तंत्रज्ञानापासून ते पायाभूत सविधांपर्यंतचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. सिम्युलेशनसारखे आधुनिक तंत्रज्ञान हे उपयुक्त साधन आहे.

- डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com