आध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

साधू वासवानी मिशनचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू दादा जे. पी. वासवानी हे शाकाहाराच्या प्रसारासाठी काम करत होते. तसेच प्राणीहक्कासाठी ते लढत होते. पुण्यात मुख्यालय असलेल्या साधू वासवानी मिशनचे प्रमुख ते काम पाहत होते. त्यांनी 150 हून अधिक प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत. 

पुणे : साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे. पी. वासवानी (वय 99)  यांचे आज (गुरुवार) सकाळी पुण्यात निधन झाले. सिंधी समाजाचे धर्मगुरु म्हणून त्यांची ओळख होती.

साधू वासवानी मिशनचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू दादा जे. पी. वासवानी हे शाकाहाराच्या प्रसारासाठी काम करत होते. तसेच प्राणीहक्कासाठी ते लढत होते. पुण्यात मुख्यालय असलेल्या साधू वासवानी मिशनचे प्रमुख म्हणून ते काम पाहत होते. त्यांनी 150 हून अधिक प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत. 

दादा वासवानी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 रोजी हैदराबाद येथे झाला होता. त्यांनी ऑक्सफर्ड, शिकागो, लंडन आणि न्यूयॉर्क येथे आध्यात्मिक विषयावर व्याख्यान दिले होते. दादा वासवानी हे सतत जागतिक शांततेसाठी कार्यरत होते. साधू वासवानी हे त्यांचे गुरु होते. संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात येणारा यू थन्स शांतता पुरस्कार त्यांना मिळाला होता.

Web Title: Sindhis Spiritual leader Dada JP Vaswani passed away