
माझ्या अनाथांना ज्यांनी जगवले, चार घास खायला दिले त्यांना या पुरस्काराचे श्रेय देते. समाजाने आधार दिला, म्हणून सिंधूताई जगाला कळाली.
पुणे : ‘‘मी काही मिळावे म्हणून नाही, तर लेकरांना जगायचे होते म्हणून जगले. त्यामुळे पद्मश्री पुरस्काराची अपेक्षा नव्हती. मी ‘अनाथांची माय’ हीच माझी ओळख. या ओळखीला मिळालेला हा पुरस्कार मी अनाथांना अर्पण करते,’’ अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
- Breaking: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना 'पद्मविभूषण' जाहीर!
माझ्या अनाथांना ज्यांनी जगवले, चार घास खायला दिले त्यांना या पुरस्काराचे श्रेय देते. समाजाने आधार दिला, म्हणून सिंधूताई जगाला कळाली. पद्मश्री पुरस्कारावर माझ्या एकट्याचा अधिकार नाही तर सगळ्या समाजाचा अधिकार आहे., शेकडो अनाथांना, टाकून दिलेल्या लेकरांना घडविण्याचे काम सिंधुताईंनी केली, त्यांच्या या असामान्य कतृत्वाची दखल घेत केंद्र सरकारने सोमवारी रात्री पद्म पुरस्कार जाहीर केला. त्यावेळी त्यांनी भरभरून बोलताना समाजाला धन्यवाद दिले.
- दहावीच्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी, बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ!
‘‘काळ वाईट होता, पोटाला भूक होती तेव्हा ‘फुलांच्या पायघड्यांवरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिकशील ना, कारण काट्यांना केवळ बोचने माहिती असते वेदना कळत नसतात. त्यामुळे ताई पाय मजबूत कर अस मला माझ आयुष्य सांगत होत. आणि मी तसच जगले. पद्म पुरस्कार जाहीर झाला आणि आता मला काहीच सुचत नाही, कळत नाही अशी अवस्था आहे. या पुरस्काराची कल्पना कधीही केलेली नव्हती. रिकाम्या पोटाने, रिकाम्या हाताने फिरणारी होते, आता माझ्या झोळीला ओझे पेलवत नाही एवढे प्रेम मिळत आहे.
- पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; शहर पोलिस दलातील तिघांना राष्ट्रपती पदक!
पद्म पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे, पूर्वी मी एकटी होते, आता माझे चिल्लेपिल्ले लेकर सोबत आहेत, कितीही जबाबदारी आली तरी मी ती पेलू शकते. आता आणखी जोमाने कामाला लागणार,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)