
लॉकडाऊन काळात हे केवळ मनोरंजन नव्हे; तर कोरोना पश्चात नव्या संगीत युगाची नांदी म्हणून कलाकार याकडे पाहू लागले आहेत. या मैफली म्हणजे विरंगुळा आणि रसिकांबरोबरचा संवाद आहे, असे काही कलाकार मानतात, तरी कुणी याकडे प्रमोशन अॅक्टिव्हिटी पाहात आहे. या विषयी काही कलाकरांशी साधलेला संवाद.
पुणे : कधी धीरगंभीर अभोगी, तर कधी यमनचा अवीट दरवळ... कधी भक्तीसंगीताचं चैतन्य, तर कधी गझलेचं मार्दव...फेसबुकवर सध्या गायक- वादकांच्या छोटोखानी मैफलींचा बहर आला आहे.
लॉकडाऊन काळात हे केवळ मनोरंजन नव्हे; तर कोरोना पश्चात नव्या संगीत युगाची नांदी म्हणून कलाकार याकडे पाहू लागले आहेत. या मैफली म्हणजे विरंगुळा आणि रसिकांबरोबरचा संवाद आहे, असे काही कलाकार मानतात, तरी कुणी याकडे प्रमोशन अॅक्टिव्हिटी पाहात आहे. या विषयी काही कलाकरांशी साधलेला संवाद.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नेहा देशपांडे-कुलकर्णा (शास्रीय गायिका) : कोरोनाचा काळ कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले स्थान निर्माण करू पाहणाऱ्यांसाठी पथ्थावर पडला आहे. कारण रसिकांकडे वेळच वेळ आहे. फेसबुरक, इन्स्टाग्रामवर कलेचा आस्वाद घेण्यासाठी, प्रोत्साहन ते हजर आहेत. त्यातही ते अभिरूची सांभाळून आहेत. हे सर्व विनामूल्य घरबसल्या कलाकाराला आणि श्रोत्याला अनुभवता येत आहे. यातून संगीत क्षेत्राला नक्कीच नवीन कलाकारांचा शोध लागेल. कला सादरीकरणाचे स्वरूप बदलत जाईल. संगीत मैफलींचे नवे युग यातून निर्माण होईल.
पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अभिनय रवंदे (हार्मोनियमवादक ) : फेसबुक हे कलाकारांसाठी व्यासपीठ बनले आहे. सध्या रसिकजन घरी असल्याने त्यांना वैविध्यपूर्ण विनामूल्य ऐकायला मिळते आहे. यातून कलाकाराला आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग सापडू शकतो. एकल मैफली वा छोट्या मैफली लोकांना याद्वारे ऐकायला मिळू शकतात. सध्या काही कंपन्यानी अशा ऑनलाइन मैफली सुरू केल्या आहेत. त्या रसिकांसाठी मोफत असल्या तरी कलाकारांना मात्र त्यांच्याकडून बिदागी दिली जाते आहे. कोरोना पश्चात नवयुगाची ही सुरवात आहे असे म्हणता येईल.
अमेरिका, लंडनमधली मुलं ऐकत आहेत अनु आजीच्या गोष्टी
राहुल रानडे (संगीतकार) : फेसबुक वा ऑनलाइन माध्यम हे संगीत क्षेत्रात फार नवे प्रवाह निर्माण करू शकेल, असे वाटत नाही. त्यामुळे गायक-वादक आणि रसिक श्रोते यांची मैफल ही कायम राहणार आहे. मात्र, एखादा असामान्य बुद्धिमत्ता वा कौशल्य असलेला कलाकार या समाज माध्यमामुळे नक्कीच चमकेल. अशा कलाकारांना हे माध्यम उपयोगी ठरू शकेल.