कोरोनानं केला चमत्कार; पुण्यातल्या पुलांवरून सिंहगड पुन्हा दिसू लागला!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

पुणेकरांसाठी अभिमानाचा असणारा सिंहगड पुण्यातल्या पुलांवरून दिसू लागला. मुळात पूर्वीच्या काळात सिंहगड तसा दिसत होता. पण, वाढत शहरीकरणानं पुणेकरांचं ते सूख हिरावून घेतलं होतं.

पुणे : पुणे शहर. एकेकाळी रिटायर लोकांचं शहर म्हणून आेळखल जायचं. बघता बघता आयटी हब झालं. पुण्यासह शेजारच्या पिंपरी-चिंचवडचाही कायापालट झाला. पण, या विकासाबरोबर हवा आणि पाणी प्रदूषणानं डोकं वर काढलं. प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचा उल्लेख होऊ लागला. पण, गेल्या तीन महिन्यांत कोरोनामुळं करण्यात आलेल्या लॉकडाउननं पुण्याची हवा शुद्ध केलीय. 

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

पुण्यातली रहदारी, वाहनांची संख्या, वाहतूक व्यवस्थेवरचा ताण हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. पण, लॉकडाउनच्या काळात पुण्यातल्या रस्त्यांवर वाहनं धावली नाहीत. अर्थातच त्याचा परिणाम शहराच्या हवेवर झाला. हवेतल्या कार्बन कमी झाला. सातत्यानं धुरकट वाटणारी हवा स्वच्छ झाली. आकाश निरभ्र झालं. परिणामी काही दिवसांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही घडल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणेकरांसाठी अभिमानाचा असणारा सिंहगड पुण्यातल्या पुलांवरून दिसू लागला. मुळात पूर्वीच्या काळात सिंहगड तसा दिसत होता. पण, वाढत शहरीकरणानं पुणेकरांचं ते सूख हिरावून घेतलं होतं. असं झालं म्हणून शहराचा विस्तार काही थांबला नाही. त्यामुळं पुन्हा पुण्यातून सिंहगड पाहता येईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. कोरोनां हा चमत्कार करून दाखवला. आजही झेड ब्रिज, आणि जोशी पूल, म्हात्रे पूल, वारज्याचा पूल आदी 
पुलांवरून तुम्हाला सिंहगडाचं दर्शन होईल. मग कधी जाताय सिंहगडाचा फोटो काढायला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinhagad can be seen from the bridges in Pune