सिंहगडाला गतवैभव मिळवून देण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

खडकवासला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराप्रमाणे पारदर्शी कारभार करण्याची उमेदवारांना सिंहगडावर शपथ दिलेल्या भाजपचे महापालिकेत 98 नगरसेवक निवडून आले. हा शपथ सोहळा शहर भाजपसाठी एका अर्थाने भाग्यकारक ठरला असून, सिंहगडाला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी नवीन कारभाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा पर्यटक, सिंहगडप्रेमी आणि स्थानिकांनी केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. त्याच धर्तीवर सिंहगडसाठीदेखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या उपस्थितीत शपथ सोहळा झाला होता. छत्रपतींच्या आशीर्वादानेच पालिकेत भाजपची सत्ता आली असून, त्यामुळे या नेतृत्वाने गडाच्या विकासाला हातभार लावावा, अशी मागणी होत आहे. 

सध्या घाट रस्त्याची दुरवस्था, "स्वराज्य निष्ठा' शिल्पाचे रेंगाळलेले काम, ऍम्पी थिएटरचे अर्धवट काम, पिण्याच्या पाण्याची टंचाई, रखडलेला रोप-वे, अस्वच्छ टाक्‍या आदी समस्यांनी सिंहगड ग्रासला आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी मंदिरासमोर सभामंडप तसेच खंडोजी नाईकांच्या वाड्याची पुनर्बांधणीची गरज आहे. पडझड झालेल्या वास्तूंची नव्याने उभारणी करावी, तळई उद्यान खुले करावे, पर्यटक, विक्रेत्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या अभ्यासक नंदकिशोर मते यांनी केल्या आहेत. 

घाट रस्त्याच्या डांबरीकरणाची आवश्‍यकता आहे. सिंहगड प्रादेशिक पाणी योजना मंजूर करावी. माजी पालकमंत्री अजित पवार यांनी डीपीडीसीतून आठ कोटी, महापालिकेतून "स्वराज्य निष्ठा' शिल्पासाठी पाच कोटी रुपये दिले. आता पालकमंत्री गिरीश बापट यांनीदेखील गडाच्या देखभालीसाठी लक्ष द्यावे. 

दत्तात्रेय जोरकर, अध्यक्ष, सांबरेवाडी वन संरक्षण समिती

Web Title: sinhagad fort issue