पुणेकरांनो, सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? मग, 'ही' बातमी वाचा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

सिंहगड घाट रस्त्यावर दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे दरड कोसळतात. आता पर्यंत लहान मोठ्या 10- 15 वेळा दरडी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. आता पर्यंत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तरी देखील पर्यटकांचे जीवितहानी धोका निर्माण होण्याचे प्रसंग बऱ्याचदा घडतात यामुळे सदर घाट रस्त्यास संरक्षणाचे दृष्टीने संरक्षण जाळी बसविणे आवश्यक आहे.

खडकवासला : सिंहगड घाट रस्त्यावरील दरडी कोसळतात म्हणून संरक्षक लोखंडी जाळी बसविण्यासाठी रस्ता सोमवार दोन डिसेंबरपासून महिनाभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

सिंहगड घाट रस्त्यावर दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे दरड कोसळतात. आता पर्यंत लहान मोठ्या 10- 15 वेळा दरडी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. आता पर्यंत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तरी देखील पर्यटकांचे जीवितहानी धोका निर्माण होण्याचे प्रसंग बऱ्याचदा घडतात यामुळे सदर घाट रस्त्यास संरक्षणाचे दृष्टीने संरक्षण जाळी बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी, यातील तज्ञांनी पाहणी केल्या नंतर लोखंडी जाळी बसविणे आणि अन्य उपाय योजना सुचविल्या आहेत. यामध्ये, जाळ्या बसविण्याच्या जागा व तातडीने काम पूर्ण करण्याचे त्या तज्ञांनी सांगितले आहे.

पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह

दरड पडल्यानंतर असल्याने तत्कालिन पालकमंत्री गिरीश बापट व आमदार भीमराव तापकीर यांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेत हा निधी मंजूर केला आहे.

#Corruption सारे काही टेबलाखालून
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Sinhagad Ghat road is closed from 2nd December to install a guard net