देह समाधीमुळे सिंहगड स्फूर्तिदायक

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

प्लॅस्टिक कचऱ्याला आवरा
सरकारने प्लॅस्टिक बंदी घातली आहे. पाण्याच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यातील पाणी संपले की त्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये न टाकता गडावर इतरत्र फेकल्या जातात. तो कचरा आटोक्‍यात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन डॉ. मालुसरे यांनी केले. 

खडकवासला - छत्रपती शिवरायांनी बांधलेली नरवीरांची देह समाधी नव्याने उजेडात आली. त्यामुळे सिंहगडाचे महत्त्व वाढल्याने गड आता मौजमजेचे ठिकाण राहिले नसून, ते आता स्फूर्तिदायक स्थळ झाले आहे. आता गडाचे पावित्र्य राखण्यावर भर दिला पाहिजे, असे मत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज डॉ. शीतल मालुसरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी गड स्वराज्यात आणण्यासाठी मुलाचे लग्न बाजूला ठेवले. विडा उचलत, त्यांनी गड जिंकण्याची शपथ घेतली. जागरण गोंधळाचा गनिमीकावा करून चढाई केली. या युद्धात ते धारातीर्थी पडले. त्यांचे बलिदान कामी आले. त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी मावळ्यांच्या मदतीने गड जिंकला. नरवीरांची देह समाधी उजेडात आल्याने नागरिक, शिवप्रेमी संघटना यांची जबाबदारी वाढली आहे.

सिंहगडावर मांसाहार, मद्यपान, धूम्रपानाचे प्रमाण कमी झाले आहे. पण, आता हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे. गडावर राहणारे नागरिक, हॉटेलचालक, दही-कुल्फी विक्रेते, प्रवासी वाहतूक करणारे चालक-मालक यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे गैरप्रकार करणाऱ्यांना जागीच रोखले पाहिजे. अनेक तरुण- तरुणी गडावर मौजमजा करण्यासाठी येत असतात. हे प्रकारसुद्धा पूर्णपणे थांबले पाहिजेत. सिंहगडावर स्वच्छता खूप चांगली असते. त्यासाठी हॉटेलचालकांनी पुढाकार घेतला, तर गड आणखी स्वच्छ राहील, अशी अपेक्षा डॉ. मालुसरे यांनी व्यक्त केली.  

प्लॅस्टिक कचऱ्याला आवरा
सरकारने प्लॅस्टिक बंदी घातली आहे. पाण्याच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यातील पाणी संपले की त्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये न टाकता गडावर इतरत्र फेकल्या जातात. तो कचरा आटोक्‍यात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन डॉ. मालुसरे यांनी केले. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinhagad inspiring Narveer Tanaji Malusare's descendant Dr. Sheetal Malusare spoke to Sakal