सिंहगड रस्त्यावर २१० कोटींपैकी झाले ८० कोटींचा खर्च

गोऱ्हे बुद्रूक : रस्त्याच्या मध्यभागी राहिलेले अर्धवट काम आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघाताची शक्‍यता वाढली आहे.
गोऱ्हे बुद्रूक : रस्त्याच्या मध्यभागी राहिलेले अर्धवट काम आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघाताची शक्‍यता वाढली आहे.

पुणे - सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते डोणजे-पाबेपर्यंत रस्त्याच्या कामावर २१० कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. त्यापैकी आजअखेर ८० कोटी रुपये या रस्त्याच्या कामावर खर्च करण्यात आले आहेत. हे काम येत्या मार्च महिन्यापर्यंत होणे अपेक्षित होते; पण अजून जवळपास निम्मे काम रखडलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंत्राटदाराकडून काम वेळेत पूर्ण करून घेणे शक्‍य झालेले नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सार्वजनिक बांधकाम विभागाने नांदेड सिटीपासून किरकटवाडी, खडकवासला, गोऱ्हे बुद्रूक, डोणजे, खानापूर आणि पाबेपर्यंत अशा ३२ किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या कामाचे कंत्राट ठेकेदाराला दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, रोडवे सोल्यूशन लोणावळा हायवे प्रा. लि. कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीकडून रस्त्याच्या एकूण कामापैकी १० किलोमीटर डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर, पाच किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सिमेंट काँक्रिटीकरणाच्या ११ किलोमीटरपैकी केवळ तीनच किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. तर, तीन किलोमीटरचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता राखणे, अपघात होऊ नयेत, या दृष्टीने रस्त्याची कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्याने पाहणार का?

पर्यटकांनी वेग मर्यादेसह इतर वाहतूक नियमांचे पालन करावे. काम सुरू असलेल्या ठिकाणी ठेकेदाराने संरक्षक पट्टी, रिफ्लेक्‍टर, बॅरिकेड्‌स आणि सूचना फलक लावणे गरजेचे आहे. शनिवार-रविवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पोलिस प्रशासनावर ताण येतो. वाहतूक पोलिसांसह होमगार्ड महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
- सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागणीनुसार आवश्‍यक त्या ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी अंदाजपत्रक मंजूर केले आहे. पुढील कार्यवाही बांधकाम विभागाने करायची आहे. 
- कल्याण गिरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com