‘सिंहगड’चे ९६ प्राध्यापक पुन्हा सेवेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे - सिंहगड एज्युकेशन सोसायटीने, सेवेतून काढलेल्या ९६ प्राध्यापकांना पुन्हा सेवेत घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसेच या प्राध्यापकांना कामावरून कमी केल्यापासूनचा पगार देण्यात येणार आहे. प्राध्यापकांना सेवेत घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून, कामावर रुजू होण्याबाबत संस्थेने प्राध्यापकांना पत्रेही पाठवली आहेत. पगार थकल्याने संस्थेतील प्राध्यापक आणि काही कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते. या प्रकरणात त्यांच्याविरोधात कारवाई करीत त्यांना सेवेतून काढले होते.

त्याविरोधात प्राध्यापकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर प्राध्यापकांना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश न्यायालयाने नुकताच दिला. तसेच, जेव्हापासून त्यांना सेवेतून काढण्यात आले, तेव्हापासूनचा पगारही द्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांतून काढलेल्या प्राध्यापकांना कामावर रुजू होण्याबाबत पत्रे पाठवण्यात आली आहेत, असे सिंहगड समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले.

Web Title: Sinhgad College 96 Professor in Service