Sinhgad : सिंहगडावर उलगडला छत्रपती राजाराम महाराजांचा संघर्षमय जीवन प्रवास

जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या किल्ल्याला सतत आठ वर्ष वेढा होता. जिंजीच्या गडावरचा वेढ्यात होते शिवपुत्र व तिसरे छत्रपती राजाराम महाराज.
Pandurang Balkavade
Pandurang BalkavadeSakal
Summary

जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या किल्ल्याला सतत आठ वर्ष वेढा होता. जिंजीच्या गडावरचा वेढ्यात होते शिवपुत्र व तिसरे छत्रपती राजाराम महाराज.

खडकवासला - जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या किल्ल्याला सतत आठ वर्ष वेढा होता. जिंजीच्या गडावरचा वेढ्यात होते शिवपुत्र व तिसरे छत्रपती राजाराम महाराज. त्यांच्याकडे होते एक हजार सैन्य. गडाखाली औरंगजेबाचे ८० हजार सैन्य होते. अशी विषम लढाई सलग आठ वर्ष सुरु होती. असा लढा देत विजय छत्रपती राजारामांनी मिळविला. असा संघर्षमय जीवन प्रवास त्यांच्या ३२३ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सिंहगडावर ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी उलगडला.

छत्रपती राजाराम महाराजांची समाधी सिंहगडावर आहे. दरवर्षी फाल्गुन वद्य नवमीला जिल्हा परिषद पुणे, हवेली पंचायत समिती, घेरा सिंहगड ग्रामपंचायत व ढमढेरे परिवाराच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन केले जाते. आज सकाळी उपसरपंच गणेश गोफनेंच्या हस्ते समाधीला अभिषेक केला. तसेच बलकवडे यांनी लिहलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान’ पुस्तकाचे प्रकाशनापूर्वी पूजन केले.

यावेळी बापूसाहेब देशमुख हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, विस्ताराधिकारी नामदेव कारंडे, समीर जाधवराव, अशोक सरपाटील, प्रवीण राजेमहाडिक, सरपंच मोनिका पढेर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पढेर, करिष्मा सांबरे, दत्तात्रेय जोरकर, विश्वनाथ मुजुमले, सुशांत खिरीड, यशवंत तागुंदे, शिवाजी तागुंदे, चंद्रकांत सांबरे, संजय गायकवाड, अमोल पढेर, दत्ता चव्हाण, ग्रामसेवक महेश खाडे, सुनित लिंबोरे, विक्रम धोंडगे, कुंभार, स्वराज सरपाटील, शिवतेज सरपाटील उपस्थित होते.

छत्रपती राणी ताराबाई यांनी छत्रपती राजारामांच्या समाधीच्या देखभालीची जबाबदारी हरजी ढमढेरे यांना दिली होते. त्यासाठी आगळंबे गाव इनाम दिले होते. म्हणून ढमढेरे परिवारातील राजाभाऊ, बाळासाहेब, विलास, काळूराम, आनंद, दीपक, रोहिदास संभाजी, धनंजय व बडोद्याचे ज्योतिरादित्य ढमढेरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Pandurang Balkavade
Rain News Update : लोणावळ्यास सोसाट्याचा वारा अन अवकाळी पाऊस; नागरिकांची तारांबळ

बलकवडे म्हणाले, 'औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती. मराठेशाहीवर आलेल्या अशा संकटात राष्ट्राच्या, समाजाच्या, संस्कृतीच्या रक्षणासाठी १९ वर्षाचे राजाराम महाराज उभे राहिले. युद्ध लांबवण्यासाठी ते राजगडावरून, प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड मार्गे जिंजीला गेले. छत्रपती राजारामांनी व्यवस्थापनातील अनेक मोठे निर्णय घेतले. नवतरुणांना स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. औरंगजेबाला शह देत त्यांनी स्वराज्य टिकवले. एखादा तरुण एकोणिसाव्या वर्षी कामाला लागतो. त्याचे तिसाव्या वर्षी मोठे साम्राज्य उभे राहिले. ही प्रेरणादायी घटना आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या चरित्राचा पुरेशा प्रमाणात अभ्यास झाला नसल्याची खंत बलकवडे यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com